मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला

'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला

जगभरात कोरोना व्हाय़रसची भीती असून याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे

जगभरात कोरोना व्हाय़रसची भीती असून याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे

जगभरात कोरोना व्हाय़रसची भीती असून याचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 12 मार्च : कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरला असताना व्यावसायासोबतच शेअर मार्केवरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण होत आहे. आज सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी घसरला असून निफ्टी 700 अंकानी घसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील (Share Market) चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही (Nifty) 470 अंकाची घसरण झाली आहे.

अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे. कालच्या बाजारात Dow 1460 अंकांनी घसरला होता. Nasdaq आणि S&P 500 ही 5 टक्क्यांपर्यंत घसरला. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असून गुंतवणुकदारांचे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

संबंधित - शेअर मार्केटला जोरदार फटका, सेन्सेक्स 2000 आणि निफ्टी 550 अंकानी गडगडला

जागतिक संकेतांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची आज मोठ्या घसरणीने सुरुवात झाली. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्य़े विक्रीही पाहायला मिळात आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 2.27 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी घसरला आहे. तेल-गॅस समभागातही आज मोठी घसरण दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि गॅस निर्देशांक 6 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करीत आहे.

1 महिना युरोपियन देशांमधून प्रवास करायला मनाई  

केंद्र सरकारने कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे. पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणू थांबविण्यासाठी अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने, ब्रिटन वगळता इतर युरोपियन देशांमधून महिनाभरासाठी प्रवास थांबविला आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की, FINANCIAL CRISIS सारखी  परिस्थिती नाही. त्याचबरोबर WHO ने कोरोनाला महाभयंकर साथीचा आजार म्हणून जाहीर केलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 4300 लोक मरण पावले आहेत. हा विषाणू 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आर्थिक मंदी रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये 39 आणि ऑस्ट्रेलियाने 17 अरब डॉलरची मदत जाहीर केली आहे.

संबंधित - Yes बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं,सेन्सेक्स1 हजार 400 अंकांनी कोसळला

First published:

Tags: Corona virus, Nifty, Sensex down, Share market fall