नवी दिल्ली, 12 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) कोरोनाव्हायरसच्या रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे. शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती, अशी माहिती सरकारने दिली होती. या रुग्णाच्या चाचणीचे रिपोर्ट आले असून त्याला Covid-19 ची लागण झाली होती, हे स्पष्ट झालं आहे.
A 76-year-old man suspected to be infected with coronavirus dies in Karnataka's Kalaburagi: Government
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2020
Coronavirus : शाळेपासून IPL मॅचपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय
कोरोना व्हायरस (Coronavirus) चा धोका वाढला आहे. मुंबई आणि ठाण्यात एक-एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Commissioner,Karnataka Health Dept:76-yr-old man from Kalaburagi who passed away&was a suspected COVID-19 patient has been confirmed positive for COVID-19. Contact tracing, isolation&other measures being taken. Telangana Govt. has also been informed as he went to a hospital there
— ANI (@ANI) March 12, 2020
राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या 33 वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील 35 वर्षीय तरुण तसेच हिंदूजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला 64 वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 14 झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 (COVID19) चे आणखी 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यापैकी 8 केरळमधील आहेत, तर राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 60 झाला आहे.
हे वाचा - आरोग्यमंत्र्यांना झाला कोरोना; पंतप्रधानांनाही व्हायरसची लागण होण्याची शक्यता
देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 14 रुग्ण आहेत. पुण्यात हे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झालं आहे. पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, तर तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात हा व्हायरस अधिक पसरू नये, राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्यात.
दरम्यान भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. भारतात एकूण 60 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट केलं आहे.
Ministry of Health & Family Welfare, Government of India: 10 new cases of #COVID19 confirmed. 8 cases are from Kerala and 1 each from Rajasthan & Delhi. Total cases rise to 60 across the country. pic.twitter.com/61eGPUKeiE
— ANI (@ANI) March 11, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus in india, Karnataka