रायपूर 13 मार्च : ‘कोरोना’चा प्रकोप आता वाढत आहे. त्याविषयी सोशल मीडियावर विविध गोष्टींचा पाऊस पडत आहे. एवढी माहिती आदळत आहे की त्यात खरं काय आणि खोटं काय हे समजणं अवघड झालं आहे. अनेक जण कुठलीही शहानिशा न करता WhatsAppवर आलेले मेसेजेस सर्रास Forward करत असतात. असाच एक मेसेज पुढे पाठवणं एका शिक्षिकेला चांगलाच महागात पडलाय. ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झाला असा मेसेज इतर ग्रपुवर पाठविणाऱ्या एका शिक्षिकेला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे. छत्तिसगडमधल्या कांकेर जवळच्या नरसिंहपूर या गावातली ही घटना आहे. हिमन कोराम असं त्या शिक्षिकेचं नाव आहे. तिला आलेले एक मेसेज तिने काही ग्रुपवर पाठवल्याचं उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाने एक आदेश काढून कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे न छापण्याचे आदेश दिले आहेत. अशी नावं छापली तर कडक करावाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा विळखा आता जवळपास 100 देशांना बसला आहे. भारतातच 70हून अधिक रुग्ण कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहेत. त्यापैकी 14 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसने आता गुगलच्या कार्यालयातही घुसखोरी केली आहे. गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला तसे आधी सिमटर्मस दिसले होते. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ट्रम्प यांना भेटून गेलेला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, पंतप्रधानांनी कोंडून घेतलं! कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपलं बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कोरोनामुळे गुगलच्या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 10 एप्रिलपर्यंत हे कर्मचारी घरी राहून ऑफिसचं काम करतील असं सांगण्यात आलं आहे. तर कोरोना व्हायरसची कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर बंगळुरू इथलं कार्यालय बंद करण्यात आलं आहे. हे वाचा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.