तेहेरान 13 मार्च : जगभर कोरोनाचा कहर झालाय. 100 पेक्षा जास्त देश त्याच्या सावटाखाली आले आहेत. चीन नंतर इराणमध्ये कोरोना वेगाने पसरतोय. तिथे आत्तापर्यंत 500 नागरीकांचा मृत्यू झाला असून 10 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. मृतांची संख्या वाढत असल्याने मृतदेहांना दफन कुठे करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर कबर खोदल्या जात आहेत. दोन फुटबॉलची मैदानं भरतील एवढ्या कबर खोदल्या जात असल्याचं उपग्रहांनी घेतलेल्या फोटोत स्पष्ट झालं असं वृत्त वॉशिग्टंन पोस्टने दिलं आहे. राजधानी तेहरानपासून 120 किलोमीटरवर असलेल्या कोम शहरांजवळ हे खड्डे खोदले जात असून त्यात मृतदेहांचं दफन करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canadian Prime Minister Justin Trudeau यांच्या पत्नी सोफी ग्रेजायर ट्रूडो (Sophie Grégoire Trudeau) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलंय. पंतप्रधानांना कसल्याची प्रकारची लक्षणे अद्याप दिसून येत नाहीत असंही या निवेदनात म्हटलं आहे. ऑफिसला सुट्टी टाकण्यासाठी सांगितलं ‘कोरोना’ झाला, पण खावी लागली जेलची हवा! सोफी या आता आयसोलेशनमध्ये राहणार असून पंतप्रधान जस्टिनही पुढची 14 दिवस एकांतवासात राहणार आहेत. एका कार्यक्रमामधून परत आल्यानंतर सोफी यांना ताप आला होता. त्यांना अस्वस्थही वाटू लागलं. त्यांची जेव्हा कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती दिली जात आहे.
ऑलिंपिक 2020 बाबत सर्वात मोठी बातमी! कोरोनामुळे 90000 कोटी रुपये जाणार पाण्यात?
जस्टिन यांना कुठलीही लक्षणे नसली तरीही ते 14 दिवस घरातच राहणार असून तिथूनच कामकाज बघणार आहेत. कॅनडाचे विरोधीपक्षनेते जगमीत सिंह सुद्धा आजारी असून ते घरूनच कामकाज करत आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येत असून मला कोरोनाची लक्षणे नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.