नवी दिल्ली, 12 मार्च : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा भारतातही शिरकाव झाला आहे. आता कोरोनापासून वाचण्यासाठी भारत सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसावर 15 एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. दरम्यान, दिल्लीत राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत शाळा, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसंच सर्वांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 60 पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा दिल्ली राज्यसरकारने शाळा आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहे 31 मार्चपर्यंत बंद राहतील. शाळा आणि कॉलेजेसला 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती अरविंद केजरीवाल य़ांनी दिली. याशिवाय राष्ट्रपती भवनसुद्धा 13 मार्चपासून नागरिकांसाठी बंद करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन कधीपर्यंत बंद राहिल याची माहिती नंतर देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
As a precautionary measure against the spread of COVID-19 Novel Coronavirus, the Rashtrapati Bhavan will remain closed for exploratory tour visits from tomorrow, March 13, till further notice.
— President of India (@rashtrapatibhvn) March 12, 2020
कोरोना बाधितांच्या उपचारांसाठी 500 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था रुग्णालयांमध्ये सज्ज करण्यात आली आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करा असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना केलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घेण्याचे आदेशही दिल्ली राज्य सरकारने दिले आहेत.
महाराष्ट्रातही 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. मात्र लोकांनी भीती बाळगण्याचं कारण नसून याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
अशी घ्या काळजी
कोरोनामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं किंवा आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे. हात वारंवार धुवा. शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. कोरोना आणि मांसाहार यांचा थेट संबंध नसला तरीही अर्धवट शिजलेलं आणि कच्च मांस खाणं टाळा. फळे, भाज्या न धुता खाऊ नका.
हे वाचा : ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस
हे वाचा : सावधान ! मास्कनंतर आता हँड सॅनिटायझरही बनावट, कारखान्यावर छापा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus