केप टाऊन, 13 मार्च : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मैदानावरील युद्ध पाहण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. आता क्रिकेट चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आज भारत आणि पाकिस्तानचे संघ वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास सज्ज झाले आहेत. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये खेळला जाईल. हा बहुप्रतिक्षित सामना दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. 11 ते 24 मार्च दरम्यान खेळली जाणारी ही स्पर्धा खरतर 50 वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंचा विश्वचषक आहे. आयसीसी मान्यताप्राप्त या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होत आहेत. विश्वचषकातील अंतिम सामना 24 मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल. स्पर्धेच्या या मोसमात 42 सामने खेळले जातील. सर्व संघ 45-45 षटके खेळतील. वाचा- IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण येथे पाहा सामना LIVE भारत-पाक यांच्यातील वर्ल्ड कपमधील हा सामना पीच व्हिजन (PitchVision) या वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकतात. या सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्याही चॅनलवर होणार नाही आहे. त्यामुळे या वेबसाईटवरच हा सामना पाहू शकतात. तर, Over-50s World Cup या ट्वीटर, फेसबुकवर लाईव्ह अपडेट वाचू शकता. वाचा- VIDEO : ‘10 षटकारानंतर वाटलं…’, एका डावात 20 सिक्सबद्दल पांड्याने केला खुलासा अशी असेल स्पर्धा या स्पर्धेत सर्व देशांचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सहभागी होतात. अनुभवी क्रिकेट वेगाने वाढत आहे. त्यांच्याकडे बर्याच क्रिकेट खेळणार्या देशांमध्ये चांगली लीग आहेत. वेटरन क्रिकेट लीगने नुकतीच पाकिस्तानमध्ये 20 वर्षे पूर्ण केली. या विश्वचषकातील पहिला सत्र आठ संघांदरम्यान खेळला गेला. यावर्षी यात चार नवीन संघ सामील झाले आहेत. याव्यतिरिक्त भारत, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, नामिबिया आणि वेस्ट इंडीज या स्पर्धेत पदार्पण करतील, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेल्स, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत यापूर्वीच सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या या मोसमात 42 सामने खेळले जातील. सर्व संघ 45 षटके खेळतील. वाचा- टीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, क्विलिफायर खेळून एन्ट्री? भारताचा संघ- शैलेंद्र सिंग (कर्णधार), इक्बाल खान, मयंक खंडवाला, पारक अनंत, तुषार झावेरी, अश्विनी अरोरा, प्रीतिन्दर सिंग, आदिल चागला, पीजी सुंदर, प्रदीप पटेल, वेरिंदर भोमबला, थॉमस जॉर्ज, संजीव बेरी, दीपक, दिलीप चव्हाण आणि श्रीकांत सत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.