नवी दिल्ली, 13 मार्च : कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट जगभरात चिंतेचा विषय झाला असतानाच आता याचं सावट अमेरिकेपर्यंत गेलं आहे. ब्राझील सरकारचा जो अधिकारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून गेला होता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलं आहे. याबाबत ब्राझीलमधील ‘एस्ताडो दे साओ पाउलो’ या वर्तमानपत्राने वृत्त दिलं आहे. एकीकडे ट्रम्प यांना भेटून गेलेला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेला असताना दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. ट्रुडो यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील एका कार्यक्रमात भाषण केलं होतं. त्यानंतरच त्यांना कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत.
Canadian media: Canadian Prime Minister Justin Trudeau’s wife has been tested positive for Coronavirus. pic.twitter.com/O3ZlJRswTy
— ANI (@ANI) March 13, 2020
कोरोनाचा धोका नाही- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या भेटीनंतर कोरोनोबाबत भाष्य केलं आहे. मी कोरोनाच्या लागण होण्याबाबत चिंतित नाही, असं ट्रम्प म्हणाले. तसंच मागील गुरुवारी ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सेनारो यांच्यासोबत भोजन केल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची कोणतीही भीती नाही, कारण त्यांनी काहीही असामान्य केलं नाही, असंही ट्रम्प म्हणाले. अनेक राजकारण्यांपर्यंत पोहोचला कोरोना दरम्यान, कोरोनाव्हायरसने आतापर्यंत लाखो जणांना विळखा घातला आहे. तर हजारो जणांचा बळी घेतला आला. ब्रिटनच्या (Britain) आरोग्यमंत्री नदीन डॉरिस (Nadine Dorries) यांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्याही आरोग्याला धोका आहे. त्यांनाही व्हायरसची लागण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण काही दिवसांपूर्वीच नदीन डॉरिस या पंतप्रधानांना भेटल्या होत्या. **हेही वाचा-** धक्कादायक! भारतात ‘कोरोना’ने घेतला पहिला बळी; कर्नाटकातल्या वृद्धाचा मृत्यू मंत्र्यांनाच कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने आता ब्रिटनमधील नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 26,000 लोकांची तपासणी झाली आहे, त्यापैकी 350 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात एक लाखापेक्षा जास्त लोकांचा या व्हायरसची लागण झाली आहे, तर 4 हजार पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.