मुंबई, 12 मार्च : Coronavirus चा संसर्ग झालेल्यांची संख्या देशात वाढत आहे. हा व्हायरस चीनमधून साऱ्या जगात पसरला आहे आणि महाराष्ट्रातही Covid -19 म्हणजेच कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. हा व्हायरस संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातून संक्रमित होतो. पण त्याबरोबरच एक दुसरी मोठी बातमी संशोधनातून पुढे आली आहे. कोरोना व्हायरस प्लास्टिक रॅप किंवा स्टेनलेस स्टीलवर बराच काळ जिवंत राहू शकतो आणि अशा प्लास्टिकला हात लावला तर संक्रमित होऊ शकतो.
वेगवेगळ्या वस्तू आणि पृष्ठभागावर Coronavirus किती काळ टिकू शकतो याविषयी शास्त्रज्ञांमध्ये अजूनही अनेक मत-मतांतरं होती. पण ताज्या संशोधनातून यातल्या अनेक शंकांवरचा पडदा दूर झाला आहे.
अमेरिकेतल्या हॅमिल्टन इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतल्या संशोधकांनी कोरोना व्हायरस कुठल्या पृष्ठभागावर अधिक काळ कार्यरत राहू शकतो याचा अभ्यास केला.
वाचा - जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार
त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, कोरोना व्हायरसला प्लॅस्टिक आवडतं. म्हणजे प्लास्टिक आणि स्टीलच्या पृष्ठभागावर तो तीन दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकतो. म्हणजे तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू पॅकेजिंग करून येताना एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली तर त्यावरून तो व्हायरस थेट तुमच्या घरापर्यंत येऊ शकतो.
वाचा - काळजी वाढली! कोरोनाची लक्षणं दिसायला लागत आहेत 5 ते 14 दिवस
तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू हातळणाऱ्या कुणालाही संसर्ग झालेला असेल तर कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणून ऑनलाइन शॉपिंग करताना सावधान! काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार, नोटांच्या कागदावरही काही तास कोरोना व्हायरस जिवंत राहू शकतो. त्यामुळे कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली नोट हाताळली तर त्याचं संक्रमण होऊ शकतो. सतत साबणाने हात धुणं, अल्कोहोलिक सॅनिटायझर वापरणं हाच त्यावरचा उपाय आहे.
संबंधित - सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’
प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलचा वापर असलेली फोन कव्हर्स, पॅकेजिंग मटेरिअल यावर कोरोना व्हायरस अधिक काळ राहू शकतो. त्यामुळे या वस्तूंना हात लावल्यावर तो चुकूनही तोंडाला, नाकाला, चेहऱ्याला किंवा डोळ्याला लावू नये. साबणाने स्वच्छ हात धुणं हाच त्यावरचा पर्याय आहे.
अन्य बातम्या
अरे देवा! मलायकाने हे काय घातलंय (की नाही?), VIDEO पाहून युजर्सनी केलं ट्रोल
ज्योतिरादित्यांचा थाटमाट! डोळे दिपवणारं वैभव, उद्योगपतींपेक्षा जास्त संपत्ती