पुणे, 15 ऑक्टोबर : पुण्यात पावसाचं बुधवारी दुपारपासून धुमशान सुरू होतं. रात्री मात्र जोर धरल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. रात्री पावसानं रौद्र रुप धारण केल्यानं ओढे आणि नद्यांना पूर आला आणि वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. रस्ते जलमय झाले होते. दरम्यान याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला तर जनजीवनही विस्कळीत झालं आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला रौद्र नदीचं रुप आल्यासारखं वाटत होतं. याच दरम्यान अनेक गाड्या देखील या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्या असून नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
हे वाचा- पावसाचा हाहाकार; पुण्यात गाड्या बुडल्या घरात शिरलं पाणी, मुंबई,ठाण्यात रेड अलर्ट लोहगाव भागात पार्किंगमध्ये वाहनं बुडाली मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर दुसरीकडे चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी घुसलं आहे. दत्तवाडी भागात घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे हाल झाले तर दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातही पुराचं पाणी आलं. एका रात्रीत झालेल्या मुसळधार पावसानं अर्ध पुणे पाण्याखाली गेल्याचं या 5 व्हिडीओमधून दिसत आहे. सहकार नगर,सिंहगड रस्ता,दत्तवाडी,येरवडा,लोहगाव,चंदननगर भागात वस्त्या,सोसायटीच्या भागात अनेक घरात पाणी शिरलं