मुंबई, 15 ऑक्टोबर : मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू होता. सकाळी या पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रात्रभर पाऊस सुरू होता. यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसानंतर मुंबईच्या हिंदमाता, सायन, परळ, चेंबूरसह अनेक सखल भाग पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात पुढील 24 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांना आणि प्रशासनाला हवामान विभागानं अलर्ट दिला असून गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे.
Maharashtra: Heavy rainfall led to waterlogging in parts of Pune city. (14.11) pic.twitter.com/efYxxzSW8i
— ANI (@ANI) October 15, 2020
पुण्यात रात्रभर झालेल्या पावसानं कहर केला आहे. अनेक सखल भागांमध्ये कमरेपर्यंत पाणी घुसलं आहे. दत्तवाडी भागात ओढ्याकाठच्या वस्तीतील पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले. लोहगाव भागात सोसायटीमध्ये।पार्किंग मध्ये ,फ्लॅटस मध्ये पाणी भरल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणावले भूकंपासारखे हादरे, नागरिकांमध्ये भीती
पुण्यात पावसाचा कहर, लोहगाव भागात सोसायटीमध्ये।पार्किंग मध्ये ,फ्लॅटस मध्ये पाणी भरलं pic.twitter.com/GsQhBhNELB
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) October 15, 2020
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. कोल्हापूरात रात्रभर पाऊस सुरू होता त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 5 फुटांनी वाढली असून नदीगाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयना, नीरा, कृष्णा, उरमोडी निरा नदीला पूरस्थिती निर्माण झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

)







