JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune Gas Pipeline Leakage : मुख्य रस्त्यावर गॅस पाईपलाईन लिक झाल्याने मोठा स्फोट, पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव

Pune Gas Pipeline Leakage : मुख्य रस्त्यावर गॅस पाईपलाईन लिक झाल्याने मोठा स्फोट, पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव

पुण्यातील सिहंगड रस्त्यावर असणाऱ्या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 जानेवारी : पुण्यातील सिहंगड रस्त्यावर असणाऱ्या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागली आहे. दरम्यान ही घटना काल रात्री 12 च्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत दिसत होत्या.  

तातडीने अग्निशामक दलाच्या 3 गाड्याना पाचारण करण्यात आले होते. ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्याने आग आटोक्यात येत नाही. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने वाहने जात आहेत. दरम्यान एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना ही  माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्ननंतर आग आटोक्यात आली आहे.  

हे ही वाचा :  पुण्यात काका-पुतण्याचा राडा, कुटुंबातच लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल, Video

संबंधित बातम्या

अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ घडली. त्यानंतर मोठी आग लागली. यामुळं एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. एमएनजीएलचे मुख्य अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी संबंधित विविध लाईन बंद केले आहेत.  यामुळे मोठा धोका टळला आहे.

यामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाइन लीक झाली आणि हा स्फोट झाला. यामुळे उद्या पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे. वस्ती नसलेल्या भागांमध्ये हे झालं म्हणून ठीक नाहीतर गंभीर झालं असतं असंही बोललं जात आहे.  

हे ही वाचा :  दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका

जाहिरात

जोपर्यंत पाईपलाईनमध्ये गॅस शिल्लक आहे तोवर आग सुरू राहणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तर आतापर्यंत तीन टँकरचा वापर करण्यात आलाय पण तरीही आग अद्यापही धुमसत असल्याची माहिती फायरमॅन राजेश जगताप यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या