जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पुण्यात काका-पुतण्याचा राडा, कुटुंबातच लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल, Video

पुण्यात काका-पुतण्याचा राडा, कुटुंबातच लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल, Video

पुण्यात काका-पुतण्याचा राडा, कुटुंबातच लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल, Video

काका-पुतण्यांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झाल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे.

  • -MIN READ Junnar,Pune,Maharashtra
  • Last Updated :

जुन्नर, 11 जानेवारी : काका-पुतण्यांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झाल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. जुन्नर तालुक्यातल्या वडगाव सहाणी गावात चुलत्या-पुतण्यांमध्ये हातात लाठ्या-काठ्या घेऊन तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावकी भावकीमध्ये जमिनीचे वाद काही नवीन नाहीत, मात्र हे वादच टोकाला पोहोचले. या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. रक्ताच्या नात्यांमध्येच एकमेकांना शिवीगाळ करत कुटुंबच एकमेकांना मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जाहिरात

पुरुषांमध्ये सुरू झालेल्या या हाणामारीमध्ये नंतर महिलांनीही सहभाग घेतला. यावेळी झालेल्या मारहाणीत हातात येईल त्या वस्तूंनी एकमेकांना मारहाण होत होती. ही हाणामारी थांबवण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्यामुळे अनेकांची डोकी फुटली आहेत. मारहाण प्रकरणी जुन्नर पोलिसांमध्ये एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात