प्रातिनिधिक फोटो
पुणे, 02 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. देशात जवळपास कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 हजार 965 वर पोहचली आहे. तर राज्यात हा आकडा 338 वर आहे. सध्या सोशल मीडियावर उखाणे, चारोळ्यांचा एक नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. विनाकारण घरातून फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी यमक जुळवत भन्नाट ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे रिट्वीट करत घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यात लोकांना घरीच रहा बाहेर पडू नका असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळी शक्कलही पोलीस लढवत आहेत. एका ठिकाणी गाडी घेऊन घराबाहेर पड़लेल्यांना व्यायामही पोलिसांनी करायला लावला. त्याशिवाय सोशल मीडियावरसुद्धा पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे. हे वाचा- शरद पवारांनी अखेर सोडलं मौन, मरकजच्या घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया
पुणे पोलिसांनी ट्विटरवरून भन्नाट ट्विट केलं आहे. त्यावर महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर जुन्या फोटोंवर चारोळ्या कमेंट कऱण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्येच पुणे पोलिसांनी ट्विट केलं आहे. पुणे पोलिसांनी म्हटलं की, तुळशीबाग, FC रोड आणि सदाशिव पेठ, सगळीकडे जाऊया पण लॉकडाऊन नंतर भेट’ याला रिट्विट करत महाराष्ट्र पोलिसांनीही चारोळी टाइप दोन ओळींची कविता पोस्ट केली. महाराष्ट्र पोलिसांनी म्हटलं की, ‘तिखट मिसळीवर घ्या एक वाटी तर्री, Corona पासून वाचण्यासाठी रहा आपल्या घरी’ लोकांना आवाहन करण्यासाठी पुणे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यात रंगलेलं हे कमेंट वॉर चांगलंच चर्चेत आलं आहे. आधीच जुन्या फोटोंवर कमेंटच्या ट्रेंडनं धुमाकूळ घातला आहे. त्यातच पोलीसांनीसुद्धा ट्रेंडच्या माध्यमातून अशी जनजागृती केल्यानं त्यांचं कौतुकही होत आहे. हे वाचा- डोंबिवलीत कोरोना पसरतोय, आणखी आढळले 5 रुग्ण, संख्या 19 वर