Home /News /maharashtra /

डोंबिवलीत कोरोना पसरतोय, आणखी आढळले 5 रुग्ण, संख्या 19 वर

डोंबिवलीत कोरोना पसरतोय, आणखी आढळले 5 रुग्ण, संख्या 19 वर

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 5 नविन रूग्‍ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आता 19 वर पोहोचली आहे.

डोंबिवली, 02 एप्रिल : मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज आणखी 5 नवे रुग्ण आढळून आले आहे. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज 5 नविन रूग्‍ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आता 19 वर पोहोचली आहे. नवीन रूग्‍णांपैकी 4 रूग्‍ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून 01 रूग्‍ण कल्‍याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील 03 रुग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबंधीत असून 01 रूग्‍ण कोरोनाबाधित रूग्‍णाचा सहवासित आहे. हेही वाचा - धारावीत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण नवीन रूग्‍णांपैकी कल्‍याण पुर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. दोन जणांना डिस्चार्ज कल्‍याण शहरात प्रथम आढळलेला कोरोनाबाधित रूग्‍ण आणि त्‍याचे दोन कुटुंबीय उपचारादरम्यान पुर्णपणे बरे झाले आहेत आणि त्‍यांना डिस्चार्जही देण्‍यात आला आहे. हेही वाचा - 'या' शहरात पडलाय मृतांचा खच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच झाला कोरोना सध्‍या कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पुर्नतपासणीअंती डिस्चार्ज दिलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या आता 04 झाली आहे. सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रातील एकूण 15 कोरोनाबाधित रूग्‍ण रूग्‍णालयात उपचार घेत आहे. कल्‍याण डोंबिवली महापालिकेमार्फत महापालिकेचे शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली हे विलगीकरण रूग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून महापालिका क्षेत्रातील संशयित रूग्‍णांना तिथं दाखल करून घेण्‍यात येणार आहे. पालिकेकडून हेल्पलाइन नंबर जाहीर सर्व नागरिकांना आवाहन करण्‍यात येत आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मीणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251-2310700 आणि शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 आणि 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या