मुंबई, 02 एप्रिल: दिल्लीतील तबलिगी जमात यांच्या मरकजच्या कार्यक्रमावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं आहे. 'या कार्यक्रमामुळे संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. तबलिगी जमातचा निजामुद्दीन इथे झालेला सोहळा टाळता आला असता पण तसं घडलं नाही. त्याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. अनेक ठिकाणी अजूनही सार्वजनिक कार्यक्रम होताना दिसत आहेत. असं महाराष्ट्रात घडू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला केलं आहे.' आज सकाळी शरद पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला.
'14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याकडे एक महिना आधीपासून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे नेता येईल का याचाही विचार आपण करायला हवा. दिल्लीत मरकजच्या कार्यक्रमात हजारो लोक जमले होते. तिथे परदेशातील काही नागरिकांचा समावेश होता. देशाच्या विविध भागांतून हे लोक जमले होते. त्यामुळे त्यातील काही जणांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचा-राम गोपाल वर्माच्या 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याच्या ट्वीटनंतर युजर्सचा संताप
आधीच कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असा प्रकार घडणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी', असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलं आहे.'लॉकडाऊनच्या काळात आपण बाहेर न पडता पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावं. या दिवसांमध्ये वाचन संस्कृतीला वाव द्या. अनेक उत्तम पुस्तक आहेत जी आपण वाचू शकता. याशिवाय तुम्हाला छंद असेल तर तो जोपासा. 14 एप्रिलपर्यंतची ही लॉकडाऊनची सुट्टी आपण व्यक्तीमत्त्वाचा विकास करण्यात सत्कारणी लावायला हवी.'
हे वाचा-काय आहे तबलिगी जमात? निजामुद्दीन मर्कझशी संबंधित हे लोक नेमकं काय काम करतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.