मुंबई, 17 डिसेंबर : मेंडोस चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने मुंबईसह अन्य जिल्ह्यात तापमानात घट होण्याऐवजी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद काल (दि.16) 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मुंबईत नोंदवले गेले. तर मागच्या दोन दिवसांपूर्वी 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान थंडीच्या महिन्यात तापमान वाढल्याने हवामान विभागाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रांच्या तुलनेत सर्वाधिक होते, असे हवामान खात्याने सांगितले. दरम्यान राज्यात शुक्रवारी पुण्यात 32.3, नाशिक 31.5, डहाणू 31.8 आणि रत्नागिरी 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हे ही वाचा : मेंडोस वादळ शमले पण, राज्यात अद्यापही पावसाचे सावट, मुंबईत अशी असेल स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील खोल दाबामुळे वाऱ्याचा दिशा बदलली आहे, ज्यामुळे दक्षिण पूर्वेकडे वारे वाहत आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबईत रात्रीही तापमानात वाढ झाली आहे.
शुक्रवारी, हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 24.4 अंश, तर सांताक्रूझ येथे 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागच्या चार दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरात वातावरणात गारवा होता परंतु कालपासून वातावरण बदलामुळे तापमान वाढले आहे.
मुंबईत हवामान खराब झाल्याने श्वसनाच्या त्रासात वाढ
मुंबईत तापमान वाढीसोबत हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मागच्या काही दिवसांच्या तुलनेत हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ असल्याची नोंद झाली. हवामान विभागाच्या मते, वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे प्रदुषनाचे कण जैसे थे राहिल्याने धुक्याचे सावट आले होते. खराब हवामान आणि विषारी हवेमुळे रुग्णालयांमध्ये अॅलर्जी आणि श्वसनाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
हे ही वाचा : डिसेंबर महिन्यातही मुंबईत उकाडा, इथं चेक करा तुमच्या शहरातील हवामान
मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली होती. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ थांबल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.