पुणे, 10 जून : कोरोना व्हायरसमुळे मार्चपासून शाळा-महाविद्यालयं बंद आहेत. शाळा-महाविद्यालंय पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र तीन महिन्यांपासून महाविद्यालयं बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन क्लास सुरू करण्यात आले आहेत. पुण्यातील रसायनशास्त्र शिकवणाऱ्या एका शिक्षिकेनं ऑनलाइन क्लास घेण्यासाठी अजब जुगाड केला आहे. या शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्यातील रसायनशास्त्राच्या शिक्षिका मौमिता बीने यांनी ऑनलाइन क्लास घेण्यासाठी एक भन्नाट आयडिया वापरली आहे. त्यांनी आपला व्हिडीओ LinkedIn वर शेअर केला आहे. मौमिता यांच्याकडे ट्रायपॉड नाही त्यामुळे मोबाईल समोर ठेवून शिकवायचं कसं हा प्रश्न होता. पण यावर त्यांनी अगदी भन्नाट पद्धतीनं उपाय शोधला आहे हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकते.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन दोऱ्यांच्या आधारे हँगर लटकवून त्यामध्ये मोबाईल अडकवला आहे. या मोबाईवरून लाईव्ह सुरू आहे. या व्हिडीओ आपण पाहू शकता शिक्षिका फऴ्यावर सूत्र लिहून शिकवत आहेत. या व्हिडीओला LinkedIn 368 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा- टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल हे वाचा- tik tok स्टार होण्यासाठी खाकी वर्दीत कर्मचाऱ्यांनी लावले ठुमके, VIDEO VIRAL संपादन- क्रांती कानेटकर