tik tok स्टार होण्यासाठी खाकी वर्दीत कर्मचाऱ्यांनी लावले ठुमके, VIDEO VIRAL

tik tok स्टार होण्यासाठी खाकी वर्दीत कर्मचाऱ्यांनी लावले ठुमके, VIDEO VIRAL

पोलीस शिपायी असलेल्या 2 कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

गोरखपूर, 07 जून: टीकटॉकवर (tik tok) भन्नाट व्हिडीओ तयार करून एकारात्रीत स्टार झाल्याचे अनेक किस्से ऐकले असतील. पण याच टिकटॉकवर खाकी वर्दीत डान्स करणं दोन पोलीस शिपायांना चांगलंच महागात पडलं आहे. सपना चौधरीच्या गाण्यावर दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओनंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात सक्त ताकीद देण्यात आली.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा हा (tik tok) व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. खाकी वर्दीत या दोघांचा डान्स केलेला टिकटॉक (tik tok) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तुफान लाईक्स मिळाल्या मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताण आणि दबाव वाढल्यानं हा व्हिडीओ कर्मचाऱ्यांना महागात पडला.

हे वाचा-क्वारंटाइन सेंटरमध्ये 'एक चतुर नार' गाण्यावर केला डान्स आणि झाला रॉकस्टार!

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस शिपायी असलेल्या विवेक कुमार आणि प्रदीप कुमार या दोघांनी डान्स करण्यात चुकीचं काय आहे असा सवाल उपस्थित केला. हा व्हिडीओ एसएसपीपर्यंत पोहोचला. यावर एसपी ग्रामीण विपुल श्रीवास्तव म्हणतात की खाकी वर्दीत डान्स करणं चुकीचे आहे. या दोन्ही पोलीस शिपायांना त्यांना बोलवून सक्त ताकीद दिली आहे.

हे वाचा-अजगराच्या तावडीतून तरुणानं अशी केली हरणाची सुटका, VIDEO VIRAL

हे वाचा-निसर्ग चक्रीवादळामध्ये तुफान VIRAL होतोय हा VIDEO, पाहून पोट धरून हसाल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 7, 2020, 11:18 AM IST

ताज्या बातम्या