टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल

टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल

पोलीस अधिकाऱ्याने टोळांचा असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुमचं हसू थांबणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जून : सोशल मीडियावर हल्ली काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक भन्नाट आणि आर्श्चयात पाडणारा व्हिडिओ समोर आला आहे. देशातल्या शहरी भागात टोळधाळीनं (Locusts) आक्रण केलं आहे. काही भागात अजूनही या टोळधाडीचा हाहाकार सुरुच आहे. या टोळांचा नाश करण्यासाठी राज्यस्तरावर सर्व प्रयत्न करण्यात आले, एकीकडे सरकारने त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली, लोकांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. टोळीला पळवण्यासाठी कोणी भांडी वाजवली तर कोणी इतर कशाचा आवाज काढला. अशा परिस्थितीत, उत्तर प्रदेश पोलीस अधिकाऱ्याने टोळांचा असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुमचं हसू थांबणार नाही.

या व्हिडिओमध्ये, टोळीला छोट्या छोट्या मशीन बांधल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ती हळूहळू चालत आहे. यूपी पोलिसचे अतिरिक्त एसपी राहुल श्रीवास्तव यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल श्रीवास्तव यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की - 'प्रिय टोळ, जर तू आमच्या पिकांचं नुकसान केलं तर आम्ही तुझ्याकडून नांगर चालवून घेऊ!'

राहुल श्रीवास्तव यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत साडे आठ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर सातशेहून अधिक लोकांनी त्याला लाईक केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे. काही लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत तर काहींनी त्यांचं समर्थन केलं आणि तो गमती कॅप्शनसह शेअर केला आहे.

तर दुसरीकडे, आयएफएस सुशांत नंदा यांनीही एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक माणूस मास्यांना बिअर पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहलं की, 'हे मच्छी खूप लकी आहे कारण तिला गरम दिवसांमध्ये थंड बिअर पिण्यासाठी मिळाली आहे.'

लोकांनी या व्हिडिओलाही खूप पसंती दिली आहे. मासे दारू पिताना पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही हे खोटं असल्याचंही बोलत आहेत. पण सोशल मीडियावर अशा व्हिडिओमुळे लोकांची चांगलीच गंमत झाली आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 8, 2020, 11:44 PM IST

ताज्या बातम्या