JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Amol Mitkari and Chandrakant Patil : ‘मंत्रिपदाची भीक मागितली हे चालेल का? अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

Amol Mitkari and Chandrakant Patil : ‘मंत्रिपदाची भीक मागितली हे चालेल का? अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेकीच्या प्रकारानंतर देखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 डिसेंबर : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेकीच्या प्रकारानंतर देखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत. मग त्यांनी मताची भीक मागितली का किंवा मंत्री पदाची भीक मागितली, असं म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीला चालेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

अमोल मिटकरी म्हणाले कि, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेकीच्या प्रकारानंतर देखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत. मग त्यांनी मताची भीक मागितली का किंवा मंत्री पदाची भीक मागितली, असं म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीला चालेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.

हे ही वाचा :  शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

संबंधित बातम्या

कुणाच्या डोळ्याला दुखापत होईल इजा होईल असं कृत्य करू नये या मताचा मी आहे लोकशाहीमध्ये वेगवेगळे मार्ग आहेत मात्र त्यांनी जे वक्तव्य केले त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली हा विषय थांबवायला हवा होता. मात्र चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत त्यामुळे मी जर असं म्हटले की चंद्रकांत पाटलांनी मताची भीक मागितली मंत्रीपदाची भीक मागितली असे म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीला चालेल का असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

जाहिरात

अजित पवारांचाही घाणघात

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सारखं काही ना काही चुकीचं बोलतात, महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कोणी सांगितलं तुम्हाला भीक मागितली म्हणून? आम्ही जर भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर काय वाटेल तुम्हाला? पण आम्ही असं बोलणार नाही,’ असं टीकास्त्र अजित पवारांनी सोडलं.

जाहिरात

हे ही वाचा :  हल्ला प्रिप्लॅन, शाई कुणी फेकली? चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

काल पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शाई फेक करण्यात आली. दरम्यान पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला करणारे समता सैनिक दल संघटनेचे कार्यकर्ते आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. समता सैनिक दल संघटनेच्या मनोज गरबडे आणि विजय ओहाळ या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या