#ncp

Showing of 1 - 14 from 1777 results
SPECIAL REPORT : 'शिवसैनिकांनी 420 चा गुन्हा दाखल करावा', विरोधकांकडून युतीची खिल्ली!

Feb 19, 2019

SPECIAL REPORT : 'शिवसैनिकांनी 420 चा गुन्हा दाखल करावा', विरोधकांकडून युतीची खिल्ली!

19 फेब्रुवारी : शिवसेना भाजपच्या 'युती पार्ट टू'ची खिल्ली उडवण्याचा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी आजही सुरूच ठेवला आहे. राष्ट्रवादीने तर थेट सेना भवनासमोरच एक मजेशीर पोस्टर लावले आहे. तर मनसेनं उद्धव ठाकरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचं भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले आहे. राजकीय व्यवहार म्हणून सेना-भाजपची युती झाली असली तरी, दोन्ही पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मनं पुन्हा कशी जुळणार हा प्रश्नच आहे. अशातच अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज शिवसैनिकांची नेमकी कशी समजूत घालतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close