पुणे, 18 सप्टेंबर : विकास कामाची पाहणी असो की घेतलेला शपथविधी असो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामप्रहर हे आता समीकरणच झालं आहे. आज भल्या पहाटे अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले आणि मग यंत्रणेची एकच धांदल उडाली. एरव्ही झोपेत असलेल पिंपरी चिंचवड प्रशासन आज भल्या पहाटेच खडबडून जागं झालं. कारण दस्तुरखुद्द अजित पवार शहरात दाखल झाले आणि त्यांनी थेट महामेट्रोच्या कार्यालयात शिरकाव करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अर्थात अजित पवारांचा हा दौरा नियोजित होता. त्यामुळे आढावा बैठकीला महामेट्रोचे अधिकारी हजर होते. मात्र, ही महामेट्रो पिंपरी चिंचवड महापालिकेच्य हद्दीतून धावणार असल्याने महापालिका प्रशासन आणि मेट्रोच्या वाटेत येणारी 300 झाडं काढली जाणार आहेत. यासाठी वृक्षप्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी हजर राहणं अपेक्षित होतं. मात्र, इतक्या पहाटे अजित पवार येतील असं माहीत नसल्याने ते साखर झोपेतच राहिले तर नेहमी पुढे पुढे करत गराडा घालणारे कार्यकर्ते पदाधिकारी नगर सेवकही गार झोपेत होते. दिशाने शेवटचा कॉल 100 नंबवर केला होता का? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य पुणे आणि पिंपरीला जोडण्यासाठी या महामेट्रोला तब्बल 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठीचं नियोजन पूर्ण झालं आहे. त्याच बरोबर फुगेवाडी ते पिंपरी या स्थानकादरम्यान असलेल्या 3 किलोमीटर अंतरावर रुळही टाकण्यात आले आहेत. पण आज अजित पवार या मेट्रोतून केवळ एक किलोमीटरचा प्रवास करू शकले. याचाच अर्थ या महामेट्रोच काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचं स्पस्ट होतं. चक्क पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास, पाहा अजित पवारांच्या हटके स्टाईला VIDEO विशेष म्हणजे साधारण 2 वर्षांपासून सुरू झालेला या मेट्रोच्या कामाला खडकी कॅन्टोमेंट प्रशासनाने ब्रेक लावला आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येणारा खडकी परिसर लष्कराच्या हद्दीत येतो आणि त्यामुळे मेट्रो प्रशासनाला लष्कराची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी अद्यापही न मिळाल्याने इथे मेट्रोच काम रखडलं आहे. मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, कोरोना काळात तरुण-तरुणींचा धिंगाणा एकूणच काय तर या सगळ्या कामाची पाहिणी करून अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. पण आता पाहणी करून जाणारे अजित पवार रखडलेली मेट्रो प्रत्यक्षात रुळावर कधी आणतात हे बघावं लागेल.