जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, महापौर बंगल्याच्या बाजूलाच तरुण-तरुणींचा धिंगाणा

मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, महापौर बंगल्याच्या बाजूलाच तरुण-तरुणींचा धिंगाणा

मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, महापौर बंगल्याच्या बाजूलाच तरुण-तरुणींचा धिंगाणा

ठाण्यातल्या उपवन परीसरातील कॅफे कोयला असं या हुक्का पार्लरचं नाव असून या हुक्का पार्लरच्या आत तरुण-तरुणी हुक्का ओढतांना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 18 सप्टेंबर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे लोकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली. पण अशात ठाण्यात मात्र भयंकर प्रकार समोर आला आहे. कोरोना काळातही ठाण्यात सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आलाय ठाण्याच्या उपवन परीसरात. एकीकडे सोशल डिस्टंसिंग आणि महामारी काळामुळे अनेक वैध व्यवसाय बंद पडलेत तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पण अवैध व्यवसायांना हे लागू पडत नाही असंच दिसतं. ठाण्यातील उपवन परीसरात ठाणे महापौर बंगल्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा पर्दाफाश महाराष्ट्र नव निर्माण सेनेने केला आहे. मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी या हुक्का पार्लरमध्ये सुरू असलेला सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. ज्यामुळे ठाण्यात करोना काळातही सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत हे समोर आलं आहे. दिलासादायक बातमी! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी ठाण्यातल्या उपवन परीसरातील कॅफे कोयला असं या हुक्का पार्लरचं नाव असून या हुक्का पार्लरच्या आत तरुण-तरुणी हुक्का ओढतांना दिसत आहेत. तर हुक्क्या सोबतच अनेक नशेचे पदार्थ देखील इथे मिळतात असं हुक्का पार्लरमध्ये काम करणारा एक तरुणच व्हिडिओमध्ये सांगत आहे. चक्क पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास, पाहा अजित पवारांच्या हटके स्टाईला VIDEO गाण्यांचा मोठा आवाज आणि टेबलावर हुक्का अशी दृश्यी ते ही उघडपणे यामुळे नक्कीच या अशा हुक्का पार्लरवर राजकीय वरदहस्त असणार यांत काही शंका नाही. या मुद्दा उपस्थित करत एकीकडे मंदिरे बंद आहेत अनेक वैध व्यावसायिकांना नियमांमुळे त्यांचे व्यवसाय सुरू करता येत नाहीयेत असं असताना ठाण्यात हुक्का पार्लर कोणाच्या वरदहस्ताने हे उघड झालंच पाहिजे अशी मागणी मनसेने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात