सुशांतची मॅनजर दिशाने शेवटचा कॉल 100 नंबवर केला होता का? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

सुशांतची मॅनजर दिशाने शेवटचा कॉल 100 नंबवर केला होता का? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दिशाने मृत्यूआधी 100 नंबरवर फोन केल्याचं सांगण्यात आलं होतं. पण तिने हा फोन केलाच नव्हता तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीशी बोलत असल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.

मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता अशी माहिती होती. पण दिशाने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा खुलासा भाजपच्या एका नेत्याने उघड केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला बोलवून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे असं सांगितलं होतं.

चक्क पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास, पाहा अजित पवारांच्या हटके स्टाईला VIDEO

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आला आहे. मुंबई पोलीस आणि दिशाच्या आई-वडीलांशी यासंबंधी चौकशी केली असता ही एक फक्त कहानी आहे असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. तपासानंतर 1 जून ते 8 जून या कालावधीत दिशाच्या मोबाइल फोनवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन आला नाही. तसंच सुशांतलाही यांना फोन केला नाही. तर त्यावेळी ती तिच्या लंडनमध्यल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती.

मनसेनं केला ठाण्यात हुक्का पार्लरचा पर्दाफाश, कोरोना काळात तरुण-तरुणींचा धिंगाणा

मृत्यूच्या जवळपास एक महिना आधी 10 मे रोजी दिशाच्या मोबाइलवरून 100 वर एक फोन करण्यात आला होता.

Coronavirus: कोरोनाचा देशात कहर, गेल्या 24 तासांत 97 हजार लोकांना कोरोनाची लागण

का केला गेला 100 नंबरवर फोन?

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिशाच्या फोनवरून कॉल केला होता. दिशा आणि तिचा होणारा नवरा रोहन यांना आपलं मालाडचं घर स्वच्छ करण्यासाठी गाडीने जायचं होतं. तिथे जाण्यासाठी ई-पास कसा बनवायचा याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 18, 2020, 11:27 AM IST

ताज्या बातम्या