JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पवार 'हाऊस' नाही, 'पॉवर हाऊस'; Silver oak का आहे राजकारणात केंद्रस्थानी?

पवार 'हाऊस' नाही, 'पॉवर हाऊस'; Silver oak का आहे राजकारणात केंद्रस्थानी?

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवास्थान म्हणजे बंगला वर्षा, ठाकरे परिवाराचं निवासस्थान मातोश्री या बरोबरच राजकीय दृष्ट्या महत्वाचा बंगला म्हणजे पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक. आज संपूर्ण देशाचं लक्ष सिल्व्हर ओक या बंगल्याकडे लागले आहे. सिल्व्हर ओक हे एका झाडाचं नाव आहे, पण असं असलं तरी देखील कोणत्याही महाराष्ट्रातील व्यक्तीसमोर हे नाव घेतलं तर त्यांना आठवतो, तो शरद पवारांचा मुंबईतील बंगला. बोलण्यासाठी हा एक बंगला किंवा निवासस्थान आहे. परंतू असं असलं तरी देखील या बंगल्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतात किंवा त्याचा संबंध असतोच.

जाहिरात

सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवास्थान म्हणजे बंगला वर्षा, ठाकरे परिवाराचं निवासस्थान मातोश्री या बरोबरच राजकीय दृष्ट्या महत्वाचा बंगला म्हणजे पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक. आज संपूर्ण देशाचं लक्ष सिल्व्हर ओक या बंगल्याकडे लागले आहे. सिल्व्हर ओक हे एका झाडाचं नाव आहे, पण असं असलं तरी देखील कोणत्याही महाराष्ट्रातील व्यक्तीसमोर हे नाव घेतलं तर त्यांना आठवतो, तो शरद पवारांचा मुंबईतील बंगला. बोलण्यासाठी हा एक बंगला किंवा निवासस्थान आहे. परंतू असं असलं तरी देखील या बंगल्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतात किंवा त्याचा संबंध असतोच. दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोड जवळ 22 हजार स्क्वेअर फूट इतकी पसरलेली सिल्व्हर ओक इस्टेट सोसायटी. आज याला पवारांचं घर म्हणून ओळख मिळाली आहे, पण असं असलं तरी हे एकेकाळी पारसी समुदायाची सोसायटी होती. आज हजार करोड इतकी किंमत असलेली हि इस्टेट सोराबजी कांगा ट्रस्टच्या ताब्यात होती. फक्त पारसी कुटूंबियांसाठी असलेल्या या सोसायटीमध्ये साधारण नव्वदच्या दशकात इतर समुदायातील लोकांना ही घर घेण्यास परवानगी मिळाली. 2013 साली पवारांनी आपलं निवासस्थान सिल्वर ओकला शिफ्ट केलं, ज्यामुळे अशी अफवा होती की पवारांना मुंबई क्रिकेट असोशिएशनवर पुन्हा वर्चस्व मिळवायचे आहे, म्हणून त्यांनी आपला कायमचा पत्ता मुंबईला हलवला. 2019 साली विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी याच बंगल्यावर घडत होत्या, तेव्हा पत्रकारांपासून सर्व देशाचं लक्ष सिल्व्हर ओक कडे लागले होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे झालेल्या शपथविधीपासून ते सरकार पाडून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे यात सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकांची महत्वाची भूमिका होती असं मानलं गेलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका करताना अनेक विरोधकांकडून असं म्हटलं जायचं की, सरकारचा रिमोट वर्षावर नाही तर सिल्व्हर ओक बंगल्यात आहे. एवढंच काय तर अनेक आंदोलक असोत किंवा सामान्य लोक, ते आपले प्रश्न घेऊन या बंगल्यावरच येतात. ज्यामुळे या सिल्वर ओक बंगल्याला ‘पॉवर हाऊस’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिल्व्हर ओक बंगल्याविषयी इतर थोडी माहिती तुम्हाला वर्षावर जायचं असोत किंवा मग मोतोश्री, सह्याद्री सगळीकडे लोकांना कडक सुरक्षतेमधून जावं लागायचं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिल्वर ओकला तितकीशी सुरक्षा नाही. इथे कार्यकर्ते किंवा सामान्य लोक पवारांना थेट भेटू शकत होते. बाहेरील सुरक्षा रक्षक तुम्हाला सांगतात की, शरद पवार आत आहेत किंवा त्यांना किती वेळ लागण्याची शक्यता आहे. तुम्ही तिथे थांबू शकता, त्यानंतर कधी शरद पवार बाहेर येतात, तर कधी लोकांना आत भेटायला बोलवलं जाऊ शकतं. हे जवळपास एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयासारखे आहे. एका आमदाराने या बंगल्याबद्दल सांगितले की, ‘‘सुरक्षा रक्षक फक्त एक चिठ्ठी पाठवतात की इथे कोणी आलं आहे किंवा त्या व्यक्तीचं काय काम आहे. सहसा पवार पवार हे त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करतात.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या