शिवाजी विद्यापीठ हे सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिरच आहे. या ठिकाणी विविध कला, साहित्य, भाषा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात पारंगत होण्यासाठी देश विदेशातूनही विद्यार्थी येत असतात. त्यातच आता जगभरात सर्वत्र सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकता येणार आह...