मुंबई : शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हटलं जातं आणि हे त्यांनी अनेकवेळा सिद्ध देखील केलं आहे. आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत. ज्यांना पवारांच्या पॉलिटिकल आयुष्याबद्दल ठावूक असेल, पण पवारांच्या पर्सनल आयुष्य आणि लग्नाविषयी फार कमी लोकांना ठावूक असेल.
- १९६७ साली शरद पवारांच्या आयुष्यात प्रतिभाताई आल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच वर्षी त्यांना आधी आमदारकी मिळाली आणि त्यानंतर त्यांना प्रतिभाताईचं स्थळ आलं.
- प्रतिभा पवार या क्रिकेटपटू सदू शिंदे यांची मुलगी आहेत. तसेच शरद पवारांचे मोठे भाऊ माधवराव पवार यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांच्या प्रतिभाताई भाची. अरविंद राणे यांनीच शरद पवारांसाठी प्रतिभा यांचं स्थळ सुचवलं.
सोर्स : गुगल
लग्नासाठी तयार नव्हते शरद पवार
- नुसतीच आमदारकी मिळाल्याने शरद पवार आधी लग्नासाठी तयार नव्हते. मात्र आईच्या आग्रहाखातर मुलगी पाहण्यासाठी तयार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिभाताई यांना न पाहाताच शरद पवारांनी लग्नासाठी होकार दिला होता. असं सांगितलं जातं की जेव्हा मुलगी पाहायला गेले तेव्हा ते मुलीला न पाहाता वर्तमानपत्र वाचत बसले होते. शरद पवारांची घोषणा आणि सभागृहात अश्रूंचा पूर, PHOTOS
- त्यानंतर १ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी लग्न केलं. लग्न यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतरच लावायचं असं ठरलं होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशीहीशरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.
सोर्स : गुगल
संयम बाळगून बायकोनी दिली साथ
- अखेर संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक लग्नमंडपात आले, तेव्हा शरद पवार व प्रतिभा पवार यांचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रतिभाताई पवार शरद पवार यांना म्हणाल्या होत्या की, आणखी दहा मिनिटं उशीर झाला असता तर त्या तिथेच कोसळल्या असत्या.
News18लोकमत
- एका मुलाखतीत प्रतिभा यांनी सांगितले होते की, लग्नाआधी शरद पवारांनी त्यांच्यासमोर एकच मूल देण्याची अट ठेवली होती. मग तो मुलगा असोत किंवा मुलगी. त्याकाळी देखील शरद पवरांनी एक मुलाचा निर्णय घतला हे खरंच कौतुकास्पद आहे.
सोर्स : गुगल
- शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना एक मुलगी आहे सुप्रियाताई. त्या सुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकारणात उतरल्या आहे. शरद पवार आणि प्रतिभाताई यांच्या ५६ वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार आले.
- कधी राजकारणात तर कधी वैयक्तीक आयुष्यात पण प्रतिभाताई खंबीरपणे त्यांच्यासोबत राहल्या. राजकारणातील सत्तापालट असो की, शरद पवारांचं आजारपण त्या नेहमीच तटस्थ खंबीर राहल्या.
- एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की माझ्या बायकोने नेसलेल्या प्रत्येक साड्यांची निवड मी करतो. त्यावरुन त्याचं प्रतिभाताईविषयीचं प्रेम प्रखरपणे दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.