(राज्याच्या राजकारणातील काका-पुतणे)
मुंबई, 02 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही. कोणत्या नेता उद्या कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसेल याची शक्यता आता उरली नाही. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप पाहण्यास मिळाले. पण आता या राजकीय राड्यात भावकीच्या वादानंतर आता काका आणि पुतण्याचा वादाचा अंक पाहण्यास मिळाला आहे. काका शरद पवार यांच्या विरोध डावून अजितदादांनी भाजपसोबतच घरोबा केला आहे. राज्याच्या राजकारणाला घराणेशाही ही काही नवी नाही. आतापर्यंत वडिल आणि मुलगा किंवा मुलगी असं राजकारण सर्वांनीच पाहिलं आहे. पण काका आणि पुतण्याचा राजकारणात अध्याय हा जुना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यातलं उत्तम उदाहरण. तर दुसरं मोठं उदाहरण म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार.
अजित पवार हे शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आले. काका पवारांनी वेळोवेळी अजितदादांनी मोठी जबाबदारी सोपवली आणि दोन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपदी बसवले. एवढंच नाहीतर अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदी, गटनेतेपदीही निवड केली. पण, 2019 ला अजित पवारांनी गुपचूप पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी उरकून टाकला. पण पवारांनी वेळीच डाव फिरवल्यामुळे दादा माघारी परतले. पण आता काही काळ उलटत नाही तेच आज पुन्हा एकदा अजितदादांनी भाजप आणि शिंदेंसोबत घरोबा केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते चांगले मित्र आणि तितकेच राजकीय विरोधकही होते. पण दोन्ही घरात पुतण्याने वेगळी चूल मांडल्याचा प्रकार घडला आहे. याआधी राज ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केला होती. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना पक्ष सोपवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढे भावकीतला वाद चांगलाच पाहण्यास मिळाला आणि तो सुरूच आहे. (Ajit Pawar : अजितदादांचं बंड यशस्वी कसं झालं? पडद्यामागच्या घडामोडींची Inside Story) गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे स्वर्गीय भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणजेच बीड असं समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष मराठवाड्यात रुजवला. आपल्या काकांचा हात धरुन धनंजय मुंडे राजकारणात आले. त्यांच्यासोबत बराच काळ काम केल्यानंतर धनंजय मुंडे हे अलगद राष्ट्रवादीच्या गळाला लागले. खुद्द अजितदादांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी बीडमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली. 2019 च्या निवडणुकीत पंकजांचा पराभव करत धनंजय मुंडेंनी विधानसभा गाठली. त्यानंतर ते मविआमध्ये मंत्रीही झाले होते. क्षीरसागर काका-पुतण्या बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्याचा संघर्ष अवघ्या बीडला सर्वश्रूत आहे. क्षीरसागर घराण्याने 3 वेळा खासदारकी भुषवली. पण काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या कमालीचा वाद विकोपाला गेला. 2019 च्या निवडणुकीत काका आणि पुतण्यात थेट लढत पाहण्यास मिळाली. पुतण्या संदीप यांनी राष्ट्रवादीकडून तर काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला. (Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं श्रेय कुणाला? शरद पवारांनी घेतलं एकच नाव) तटकरे काका-पुतणे राष्ट्रवादीमध्ये आणखी घराण्यात काका-पुतण्याचा वाद पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे. सुनील तटकरेंनी मुलगी आदिती तटकरे यांना राजकारणात आणले तेव्हा अवधूत कमालीचे नाराज झाले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट शिवसेनेत प्रवेश केला. विदर्भात देशमुख Vs देशमुख राष्ट्रवादीचं आणखी एक नेत्याच्या घरात असाच ड्रामा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्याच चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. खुद्द पुतण्या आशिष देशमुख यांनी काँग्रेसमधून 2014 ला निवडणूक लढवत काका अनिल देशमुख यांना पराभूत केलं. पण काका हार माणणार थोडी, त्यांनी 2019 च्या निवडणुकीत पुतण्या आशिष देशमुख यांना पराभूत करून परतफेड केली. आता आशिष देशमुख हे भाजपमध्ये दाखल झाले आहे.