JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खानपेक्षा हा अभिनेता खऱ्या अर्थानं ठरला कतरिना कैफचा गॉडफादर

सलमान खानपेक्षा हा अभिनेता खऱ्या अर्थानं ठरला कतरिना कैफचा गॉडफादर

सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी एका मुलाखतीत कतरिना कैफच्या (katrina kaif) करिअरबाबत मोठा खुलासा केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 फेब्रुवारी : बॉलिवूडचा दबंग म्हणजे सलमान खाननं (salman khan) अनेकांचं करिअर घडवलं आहे. अभिनेत्री कतरिनाला कैफलाही (katrina kaif)  त्यानंच लाँच केलं पण तिच्यासाठी खऱ्या अर्थानं गॉडफादर ठरला तो किंग खान म्हणजेच शाहरूख खान (shahrukh khan). शाहरुमुळेच कतरिनाच्या करिअरला गती कशी  मिळाली. याबाबतचा खुलासा प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकर (Atul Kasbekar) यांनी केला आहे. अतुल कसबेकर यांनी पहिल्या किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. एका मुलाखती मध्ये अतुल कसबेकर यांनी किंगफिशर कॅलेंडर लाँच इव्हेंटमध्ये शाहरूख खानच्या फोटोमागे कशा पद्धतीने कतरीना कैफचे फोटो दाखवले गेले आणि तिच्याच फोटोकडे सर्व जण कसे बघत राहिले याबाबत सांगितलं. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ मॉडेल म्हणून झळकली होती. अतुल कसबेकर म्हणाले, ‘त्यावेळी कतरिना खूप अवखळ होती कारण ती खूप लहान होती. मला वाटतं ती तेव्हा 18 ते 19 वर्षांची होती. खरोखरच ती खूप चांगली मुलगी आहे यात काही शंका नाही. तिला स्विम सूटमध्ये सहजपणे फोटो देता येत नव्हते कारण सवय नव्हती. तिचे फोटो काढण्यासाठी आम्हाला खूप वेळ खर्च करावा लागला होता. आम्ही तिचे काही चांगले फोटो घेण्यात यशस्वी झालो आणि तिनं चांगलं कामसुद्धा केलं.’ हे वाचा -  ‘माझा होशील ना’ मधील सर्वात महत्त्वाचा क्षण; सई-आदित्यच्या लग्नाचा VIDEO समोर ‘जेव्हा कॅलेंडर लाँच पार्टी झाली तेव्हा शाहरुख खानच्याच हस्ते कॅलेंडर लाँच करण्यात आलं. योगायोग असा की त्याचे सर्वच फोटो कतरिना कैफच्या फोटो अगेन्स्ट दाखवण्यात आले होते. सगळे जण विचारत होते की, घोड्यावर बसलेली मुलगी कोण आहे? सर्वांना कतरिना कैफचा फोटो खूप आवडला. तिथून कतरिना कैफच्या करिअरला गती येण्यासाठी बरीच मदत झाली.’, असं ते म्हणाले. हे वाचा -  टायगर श्रॉफचा मिड एयर फ्लिप, जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंटचा VIDEO VIRAL

संबंधित बातम्या

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर कतरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशांत खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये सुरु आहे. याशिवाय कतरिना कैफ सलमान खानसोबत ‘टायगर 3’ चित्रपटात सुद्धा दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या