मुंबई, 04 फेब्रुवारी : माझा होशील ना (Majha Hoshil Na) मधील सई (sai) आणि आदित्यला (Aditya) जितकी त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता ही मालिका पाहणाऱ्या आणि आदित्य म्हणजे विराज कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि सई म्हणजे गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) यांच्या चाहत्यांनाही आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे. आता त्या क्षणाची प्रतीक्षा सर्वांना आहे. त्याच क्षणाचा एका व्हिडीओ समोर आला आहे. आदित्य आणि सईचं लग्न 14 फेब्रुवारी, 2021 ला होणार आहे. व्हेलेंटाइनच्या मुहूर्तावरच दोघं लग्न करणार आहेत. अखेर आदित्य सईचा आणि सई आदित्यची होणार आहे. त्या दिवसातील एक छोटासा क्षण समोर आला आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओत पाहू शकता. आदित्य आणि सईचं लग्न लागतं आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. आदित्य सईला मंगळसूत्र घालण्याच्या तयारीत आहे. हे वाचा - डिलीव्हरीची तारीख जवळ येताच कशी झालीये करीना कपूरची अवस्था; समोर आला नवा VIDEO काही दिवसांपूर्वीच आदित्य म्हणजे लग्नाचा प्रोमो दाखण्यात आला होता. ज्यामध्ये सईनं गोड असा उखाणा घेतला होता. तेव्हा या दोघांचं लग्न होणार हे पक्कं समजलं आणि अखेर तो दिवसही जाहील झाला. आदित्य आणि सईचं लग्न आता त्यांच्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी हे व्हेलेंटाइन डेचं एक गिफ्टच असेल. हे वाचा - अभिनेते राघवेंद्र कडकोळ कालवश; ‘बाबा चमत्कार’नं घेतला जगाचा निरोप मालिकेमध्ये सध्या आदित्यचे मामा सईचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दादा मामांनी पुन्हा त्यांच्या लग्नाला विरोध केला आहे. तर सुयश सईशी लग्न करण्याच्या जिद्दीनं पेटला आहे आणि लग्न होण्यासाठी तोही आपली पूर्ण ताकद लावतो आहे. आता सई आणि आदित्यचं लग्न होईपर्यंत त्यांना कोणकोणत्या संकटांचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागेल हेच पाहावं लागेल.

)







