मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /टायगर श्रॉफचा मिड एयर फ्लिप, जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंटचा VIDEO VIRAL

टायगर श्रॉफचा मिड एयर फ्लिप, जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंटचा VIDEO VIRAL

टायगर श्रॉफ तरुण पिढीतला कमालीचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे अ‍ॅक्शन व्हिडिओज instagram वर कमालीचे लोकप्रिय होतात.

टायगर श्रॉफ तरुण पिढीतला कमालीचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे अ‍ॅक्शन व्हिडिओज instagram वर कमालीचे लोकप्रिय होतात.

टायगर श्रॉफ तरुण पिढीतला कमालीचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे अ‍ॅक्शन व्हिडिओज instagram वर कमालीचे लोकप्रिय होतात.

मुंबई, 4 फेब्रुवारी : अत्यंत कमी काळात आपला डान्स आणि धडाकेबाज ऍक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव मिळवणारी व्यक्ती म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) . अत्यंत कमी काळात त्यानं तुफान लोकप्रियता मिळवली.

टायगर श्रॉफ सोशल मीडियावरही (social media) खूप सक्रिय (active) असतो. टायगरचे फोटोज(photos), व्हिडिओज (videos) सोशल मीडियावर खूप व्हायरल (viral) होत असतात. आता नुकताच टायगरनं टाकलेला व्हिडिओ खूप कौतुक मिळवतो आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) टायगरनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ कमालीच्या कमी वेळात व्हायरल झाला आहे.

3 तासापूर्वी टाकलेल्या या व्हिडिओला 2 मिलियनहून आधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या व्हिडिओत टायगर किक करण्याआधीच मिड एअर फ्लिप करताना दिसतो आहे. सोबतच तो कूल ट्रिपल किकसुद्धा करतो आहे. टायगरचा हा छोटासाच व्हिडिओ एकदम प्रभावी आहे. टायगरच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीजही (celebrities) या व्हिडिओला उचलून धरत आहेत.

व्हिडिओला टायगरनं दिलेलं कॅप्शनसुद्धा अतिशय गंमतीशीर आहे. तो म्हणतो, 'काही मुव्ह्ज केवळ व्हिडिओ गेम्समध्येच करणं जास्त सोपं का असतं?' या कॅप्शनसोबतच टायगरनं माकडाचा इमोजीही वापरला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना हिमेश रेशमियानं लिहिलंय, 'शानदार'. याशिवाय राहुल देव यानंही कमेंटमध्ये लिहिलं आहे, 'सुप-- ' टायगरची आई आयेशा यांनीही व्हिडिओवर 'वाव' लिहिलं आहे. टायगरची बहीण कृष्णा हिनेही कौतुक करत कमेंट केली आहे.

हिरोपंती (Heropanti) या सिनेमातून टायगर श्रॉफनं बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली. तो आज ऍक्शन स्टार (action star) म्हणून प्रस्थापित झाला आहे. शिवाय गायक म्हणूनही तो लोकप्रिय आहे. कॅसानोवा हे त्याचं गाणं नुकतंच रिलीज झालं.

First published:

Tags: Instagram, Tiger Shroff, Viral video.