Google वर या 8 गोष्टी चुकूनही Search करू नका; होईल मोठं नुकसान

Google वर या 8 गोष्टी चुकूनही Search करू नका; होईल मोठं नुकसान

आपली ही google वर शोधायची सवय कधी अंगाशी येऊ शकते. आपण उघडलेली लिंक फसवी निघाली तर? Google वर माहिती शोधताना विशेषतः ई शॉपिंग ऑफर्स आणि बँक व्यवहार करताना काही खबरदारी घेतलीच पाहिजे नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.

  • Share this:

मुंबई : कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी आपण हल्ली चटकन Google करतो. आपली ही google वर शोधायची सवय कधी अंगाशी येऊ शकते. कारण आपण या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असलो तरी google काही स्वतःची माहिती आपल्याला देत नसतं. वेगवेगळ्या वेबसाइटवर असणाऱ्या लिंक्स गुगल आपल्यापुढे मांडत असतं आणि त्यातली एखादी लिंक आपण उघडून त्यात माहिती शोधतो. पण आपण उघडलेली लिंक फसवी निघाली तर? Google वर माहिती शोधताना काही खबरदारी घेतलीच पाहिजे नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. या 8 गोष्टी google वर शोधताना तर काळजी घेणं अत्यावश्यक आहे.

1. बँकेची वेबसाइट (bank website)- तुमचं खातं असलेल्या बँकेचे वेबसाइट किंवा netbanking link शोधण्यासाठी google करू नका. तुम्हाला ही लिंक किवा वेबसाइट URL माहिती असेल तर थेट ब्राउजरवर टाइप करा. कारण ऑफिशिअल वेबसाइटच्या ऐवजी तुम्ही चुकीची वेबसाइट उघडलीत तर हॅकर तुमची महत्त्वाची माहिती चोरतील आणि तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

वाचा - TVS ची 'स्मार्ट' बाइक, अपघात होताच पाठवणार अलर्ट!

2. Customer Care नंबर :  बिझनेस लिस्टिंग करणारे कधीतरी चुकीचे कस्टमर केअर नंबर किंवा लिंक्स देऊन यूजर्सना चुना लावतात. मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक झालेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांचे नंबर google वर शोधू नका. त्याऐवजी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून त्यांचा नंबर घ्या.

3. Apps आणि Software download : कुठलंही नवं अॅप डाउनलोड करण्याआधी नेमकं ऑफिशिअल व्हर्जन कोणतं हे माहिती करून घ्या. Google Play किंवा ऑफिशिअल अॅप स्टोअरचा वापर करूनच नवं application डाउनलोड करा. सारख्या नावाची फेक अॅप असतात. ती डाउनलोड केली तर malware किंवा व्हायरस येऊ शकतो.

4. औषधं किंवा आजाराची लक्षणं : आजारी पडलात किंवा बरं वाटत नसेल तर डॉक्टरला विचारण्याआधी Google करण्याची सवय वाईट. यातून चुकीची माहिती मिळण्याची शक्यताच जास्त असते. त्यातून google वर शोधून औषधं तर मुळीच घेऊ नका.

गुंतवणूक आणि स्टॉक मार्केटचा सल्ला : Google करून गुंतवणूकीचे किंवा स्टॉक मार्केटचे अपडेट्स घेत असाल तर सावधान. कारण यातला ऑथेंटिक सोर्स कोणता हे कळायला गुगलकडे मार्ग नसतो.

वाचा - वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक

5. सरकारी वेबसाइट : हॅकर्स बहुतेकदा सरकारी वेबसाइटला लक्ष्य करतात. सरकारी बँका, महापालिका, रुग्णालय या वेबसाइटवर काही वैयक्तिक माहिती शेअर करताना अधिकृत साइट आहे ना याची खात्री करून घ्या.

सोशल मीडिया लॉगइन पेज : सोशल मीडिया अॅक्सेस करताना थेट त्याची URL टाइप करणं योग्य. कारण लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सची अनेक फेक URL असतात. तिथे तुमचं साइन इन झालं तर वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.

6. ई कॉमर्स वेबसाईट्स : e commerce किंवा e shopping वेबसाइट्सवर ऑफर असतात. पण अशा फेक ऑफर देणाऱ्या काही वेबसाइट्स आहेत. Google वर दिसणाऱ्या या स्पॅम वेबसाइट्सवरच्या ऑफर्सना भुलून तुम्ही क्लिक केलंत तर बँकिंगशी संबंधित डेटा तसंच तुमचे पासवर्डसुद्धा लीक होऊ शकतात.

7. फ्री अँटी व्हायरस : Google वर अँटीव्हायरस अॅप किंवा सॉफ्टवेअर सर्च केलंत तर अनेक पर्याय येतात. त्यातून खरं, ऑथेंटिक अॅप किंवा सॉफ्टवेअर शोधणं अवघड जाईल. तुम्ही चुकून जरी फेक अॅप डाउनलोड केलंत तरी मालवेअर घुसण्याची शक्यता आहे. एकदा मालवेअर किंवा व्हायरस आला की तुमच्या सिस्टीममधून महत्त्वाची माहिती धोक्यात येईल.

वाचा - राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW

8. कूपन कोड : तुम्हाला शॉपिंगसाठी कूपन कोड मिळाला तर वापरायला हरकत नाही, पण google वर कूपन कोड शोधाल तर पुन्हा एकदा बनावट कूपन देणाऱ्या वेबसाइट्सच्या जाळ्यात अडकाल. डिस्काउंट मिळवण्याच्या नादात तुमचे अकाउंट डिटेल्स हॅक होऊन आर्थिक फटका बसू शकतो.

----------------------------------

आणखी बातम्या

एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करता? सावधान! ऐका मृत्यूची घंटा

इथे शिकणारे होतात सर्वात जास्त कोट्याधीश, तुम्हीही जाणून घ्या या यूनिवर्सिटींबद्दल!

Pubg खेळत असाल तर कधीच करू नका ‘ही’ चूक, 10 वर्षांसाठी व्हाल बॅन

रस्त्याशेजारी जोडपं करत होतं SEX, गुगलने काढलेल्या फोटोने खळबळ

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 8, 2019, 11:00 AM IST

ताज्या बातम्या