नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : पबजी मोबाईल गेम (PUBG Mobile) हा सर्वात जास्त लोकप्रिय गेम मानला जातो. मात्र आता हा गेम खेळण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळं हे नियम पाळले नाही तर तुमच्यावर बंदी लागू शकते. पबजी गेममध्ये चिकन डिनर (Pubg Chicken Dinner) मिळवण्यासाठी खेळाडू वेगवेगळे जुगाड करतात. मात्र आता पबजीमध्ये फसवणूक (Pubg Hacks and Pubg Cheating) केल्यास तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. कारण PUBG ने गेमनं फसवणूक बंद करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर आता 10 वर्षांची बंदी लागू शकते (Pubg Players 10 Years Ban). या गेमच्या डेव्हलपरनं याबाबत माहिती दिली आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीत, तिसऱ्या अॅपमधून हॅक करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्यात येणार आहे. बऱ्याच खेळाडूंकडे चीटिंग करण्यासाठी इन-गेम रिपोर्टिग प्रोसेसर असतात. त्यामुळं आता या गेमच्या माध्यमातून खेळाडूंना बॅन केले जाणार आहे. त्याचबरोबर चिटींग करणाऱ्या खेळाडूंचे नाव सार्वजनिकरित्या जाहीर केले जाणार आहे.
पबजी मोबाईल गेम प्रत्येक महिन्यात खेळाडूंच्या समस्यांचे समाधान करतात. त्यामुळं गेमिंनच्या वातावरणात सुधारणा होते. त्यामुळं आता कंपनीनं 3 हजार 500हून अधिक खेळाडूंवर बंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी