TVS ची 'स्मार्ट' बाइक, अपघात होताच पाठवणार अलर्ट!

TVS ने त्यांच्या Apache RTR 200 4V या बाइकमध्ये ब्लूटूथसह नवीन तंत्रज्ञान अपडेट केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 09:41 AM IST

TVS ची 'स्मार्ट' बाइक, अपघात होताच पाठवणार अलर्ट!

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : टीव्हीएसची सर्वात लोकप्रिय बाइक असलेल्या Apache RTR 200 4V ला आता कंपनीने आणखी स्मार्ट केलं आहे. आता या बाइकमध्ये स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. बाइकमध्ये SmartXonnect technology देण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान TVS Ntorq या स्कूटरमध्येही मिळते. मात्र Apache RTR 200 4V मध्येही या तंत्रज्ञानाला अपडेट केलं आहे. तसेच नवीन फीचरसुद्धा अपडेट कऱण्यात आले आहे.

अँड्रॉइड आणि iOS वर उपलब्ध असलेल्या टीव्हीएस स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातून ब्लूटूथ कनेक्ट करता येईल . या स्मार्टफोन अॅपच्या मदतीने Apache RTR 200 4V बाइक फोनशी जोडता येईल. बाइकचा अपघात झाला तर 180 सेकंदाच्या आत तुमच्या आपत्कालीन संपर्क यादीतील नंबरवर लोकेशनसही अलर्ट पाठवतो.

बाइकच्या डिस्प्लेवर चालकाला नेव्हिगेशनची माहिती मिळते. याशिवाय गाडी झुकल्यास त्याचीही माहिती सेन्सरमुळे मिळते. इतर बाइकप्रमाणे लो फ्युअल अलर्ट सिस्टिमही आहे. यामुळे तेल कमी झाल्यास तुम्हाला जवळच्या पेट्रोल पंपापर्यंत पोहचा येईल.

वाचा : Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अॅडव्हान्स फीचरमुळे बाइकच्या किंमतीत 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. TVS Apache RTR 200 4V ची किंमत 1 लाख 14 हजार रुपये झाली आहे. या बाइकमध्ये ड्युअल चॅनलं एबीएससुद्धा आहे. इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Loading...

वाचा : तुमच्या बजेटमध्ये स्पोर्टी लूकच्या दमदार बाइक, एक लाखांपेक्षा कमी किंमत!

वाचा : iPhone 20 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या कोणत्या फोनची किंमत झाली कमी

SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवसेनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bike
First Published: Oct 8, 2019 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...