राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW

राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW

राखीनं रितेश नावाच्या एनआरआय मुलाशी लग्न केल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणाही पाहिला नाही.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचं आयुष्य अनेक वाद आणि ड्रामानं भरलेलं आहे. मीका सिंहच्या बर्थडे पार्टीमध्ये Kiss वरून झालेला वाद ते रिअलिटी शोमध्ये स्वयंवरपर्यंत राखीच्या जीवनात आतापर्यंत अनेक गोष्टी घडून गेल्या. मागच्या काही दिवसांपासून लग्न केल्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या राखीच्या लग्नाच्या वृत्तावर कोणालाही विश्वास नाही. मागच्या काही दिवसांत राखीनं अनेक व्हिडीओ आणि सोशल मीडिया पोस्टमधून तिनं लग्न केल्याचं सांगितलं. रितेश नावाच्या एनआरआयशी लग्न केल्याचं तिनं सांगितलं. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. पण आता राखीनं खरोखरच लग्नं केल्याचं स्पष्ट झालं आहे.

राखी सावंतचा पती रितेशनं 'स्पॉटबॉय-ई' वेबपोर्टला पहिली मुलाखत दिली आहे. ज्यावरुन राखीनं खरंच लग्नं केल्याचं समोर आलं. आपल्या पहिल्या मुलाखतीत रितेशनं त्याच्या आणि राखीच्या लग्नाबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. रितेश म्हणाला, 'राखी कॅमेरा समोर कशीही राहत असली तर ती मनानं खूप चांगली व्यक्ती आहे. मी नशीबवान आहे. राखी ही मला देवानं दिलेली भेट आहे. मी आतापर्यंत तिच्यासारखी महिला पाहिली नाही.'

या 'विश्वसुंदरी' अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब

मीडियापासून दूर असण्याबद्दल रितेश म्हणाला, 'मी मीडियासमोर का यावं? त्यातून मला काय साध्य होणार आहे? काही ना काही वादग्रस्त विनाकारण लिहिलं जाईल. मला माझं खासगी जीवन मीडियासमोर मांडायला आवडत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही. त्यांना जे विचार करायचे ते करू देत. माझं कुटुंब आहे. राखीचं कुटुंब आहे आणि आम्ही दोघंही खूप खूश आहोत. मी मीडियासमोर येईल पण योग्य वेळी. सध्या तरी मी असं काही करण्याच्या विचारात नाही.'

'Superstar Singer'मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम

सिनेमात राखीनं बोल्ड सीन करण्याविषयीच्या प्रश्नावर रितेश म्हणाला, 'राखी आता विवाहित आहे आणि आता तिनं एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आपल्या पत्नीनं सिनेमात बोल्ड सीन करावेत असं कोणत्या पतीला वाटेल. हा पण तिच्या कपडे घालण्यावर माझा आक्षेप नाही ती तिच्या आवडीप्रमाणं कपडे घालू शकते.'

KBC-11 जिंकायचे होते 7 कोटी; आठव्याच प्रश्नावर शिक्षक झाले नापास मिळाले फक्त...

====================================================================

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

Published by: Megha Jethe
First published: October 8, 2019, 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading