एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करता? सावधान! ऐका मृत्यूची घंटा

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार सलग नऊ- साडेनऊ तास बैठं काम करणाऱ्यांचा लवकर मृत्यू होऊ शकतो. दररोज किमान किती मिनिटं शारीरिक हालचाल किंवा व्यायाम व्हायला हवा?

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 06:50 AM IST

एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करता? सावधान! ऐका मृत्यूची घंटा

मुंबई, 7 ऑक्टोबर : तुमचा डेस्क जॉब आहे का? कितीतरी वेळ तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून काम करता का? जागेवरून न उठता तुम्ही सतत काम करता का? नऊ तासांहून अधिक काळ दररोज बैठं काम करणाऱ्यांनी जरा लक्ष देऊन बातमी वाचा. असं केल्याने तुमचं आयुष्य कमी होतं आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल (BMJ)मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, जे लोक सलग 9 तास बसून काम करतात त्यांचा अवेळी मृत्यू होण्याची शक्यता कित्येक पटीने जास्त असते.

दररोज शरीराला किती प्रमाणात अॅक्टिव्हिटीची गरज आहे याचं प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलं आहे. WHO च्या प्रमाणानुसार, वयवर्षं 18 ते 64 दरम्यान दर आठवड्याला किमान 150 मिनिटांची शारीरिक हालचाली असलेली कामं (Active minutes), व्यायाम झालाच पाहिजे. 75 मिनिटांचा शारीरिक व्यायाम किंवा शारीरिक मेहनत दर आठवड्यात व्हायला हवी. तर आरोग्य चांगलं राहतं. लाइफस्टाइल डीसिझेस म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळायचे असतील तर एवढा व्यायाम आणि हालचाल व्हायला हवी.

Norwegian School of Sport Sciences या नॉर्वेची राजधानी ऑस्लोमध्ये असलेल्या संस्थेत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शारीरिक हालचाली आणि व्यायाम याचा जीवनमानाशी असलेल्या संबंधाचा तौलनिक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासातून असं सिद्ध झालं की, झोपेची वेळ सोडून 9 तास बसून राहतात त्या लोकांना मृत्यूचा धोका असतो. थेट तुमच्या आयुष्यातले तास यामुळे कमी होऊ शकतात, असा संबंध उल्फ एकेलुंड या शास्त्रज्ञांच्या टीमने सिद्ध केला.

जे 9 - 9.30 तास बसून काम करतात आणि त्यांची फिजिकल अॅक्टिव्हिटी आठवड्याला 150 मिनिटं म्हणजे दररोज 20 मिनिटांपेक्षा कमी असते, त्यांच्यावर मृत्यूची घंटा वाजत राहणार असं समजावं. मृत्यूचा धोका टाळायचा असेल तर दररोज किमान 24 मिनिटं मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली म्हणजेच हलका व्यायाम करायलाच हवा.

याशिवाय 300 मिनिटं दररोज शरीराची हालचाल होईल असं काम करायलाच हवं. म्हणजे एका जागी बसून काम करणाऱ्यांनी दर तासाने काही मिनिटांसाठी जागचं उठून थोडं भरभर चालणं किंवा ऊठ-बस करायलाच हवी. तरंच मृत्यूचा धोका तुम्ही टाळू शकाल.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 06:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...