रस्त्याशेजारी जोडपं करत होतं SEX, गुगलने काढलेल्या फोटोने खळबळ

रस्त्याशेजारी जोडपं करत होतं SEX, गुगलने काढलेल्या फोटोने खळबळ

गुगलच्या स्ट्रीट कारने काढलेला फोटो गुगल मॅपवर अपलोड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याआधीही गुगलकडून असे फोटो अपलोड झाले होते.

  • Share this:

तैवान, 07 ऑक्टोबर : रस्त्याशेजारीच चारचाकी गाडीजवळ सेक्स करत असलेल्या एका जोडप्याचे फोटो गूगल मॅपच्या माध्यमातून जगासमोर आहे आहेत. तैवानमधील जोडपं रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिथंच सेक्स करत असलेला फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पश्चिम तैवानमधील तायपिंग जिल्ह्यातील आहे. गूगलच्या स्ट्रीट व्ह्यू कारने हा फोटो काढला आहे.

गूगल मॅपवर हा फोटो अपलोड होताच लोक या फोटोचं लोकेशन शोधत आहेत. अद्याप या जोडप्याची माहिती समजू शकलेली नाही. याशिवाय त्या जोडप्यालाही त्यांचा फोटो काढला गेला आहे आणि तो इंटरनेटवर असा अपलोड झाला आहे याची कल्पना आहे की नाही हे समजू शकले नाही.

सध्या या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गुगलवर न्यूड फोटो वरून निशाणा साधला जात आहे. तसेच गुगल कधी असंही दृश्य दाखवेल असं वाटलं नव्हतं असंही काही युजर्सनी म्हटलं आहे.

गुगलच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, गूगलवर कोणत्या प्रकारची माहिती टाकत येत नाही हे समजून घेण्यासाठी गुगलच्या कंटेट पॉलिसीचे नियम वाचू शकता. यामध्ये पॉर्नोग्राफी, सेक्स संबंधित कंटेटला परवानगी नाही. याआधीही गुगल मॅपवर अशा प्रकारचे फोटो समोर आले आहेत. गेल्या वर्षी तैवानमधील एका महिलेचा टॉपलेस फोटो टिपण्यात आला होता. असे फोटो अपलोड झाल्याचं लक्षात येताच गुगल ते काढून टाकले.

वाचा : दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, तुम्हीच बघा!

SPECIAL REPORT: रोहिणी खडसेंना शिवसेनेचा खोडा, मुक्ताईनगरमध्ये युतीला तडा?

Published by: Suraj Yadav
First published: October 7, 2019, 12:12 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading