वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक

वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी काही असे स्पर्धक भेटतात जे आयुष्यात अनेक संघर्ष करून KBC च्या हॉट सीटपर्यंत पोहोचलेले असतात.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : सध्या टीव्हीवर रिअलिटी शोची चलता आहे. मागच्या काही दिवसांपासून लोकप्रिय रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा टीआरपी वाढताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या या क्विज शोला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे. या शोमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसोबतच या शोमधील स्पर्धकही खूप चर्चेत राहतात. मात्र काही स्पर्धक असे असतात जे त्यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष करून KBC च्या हॉट सीटपर्यंत पोहोचलेले असतात. अशीच एक स्पर्धक जेव्हा हॉट सीटवर बसली तेव्हा तिच्या संघर्षाची कहाणी ऐकून खुद्द बिग बी सुद्धा भावुक झाले.

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अनेकदा असे स्पर्धक पाहायला मिळतात. ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला आहे.  KBC 11 च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अशीच एक स्पर्धक पोहोचली. अनेक समस्यांचा सामना करत आपल्या जीवनात पुढे जात असलेली दीपज्योती एक अशी व्यक्ती आहे जिच्याकडून सर्वांनीच प्रेरणा घ्यावी. दीपज्योतीनं जेव्हा तिच्या संघर्षाची कहाणी या शोमध्ये सांगितली त्यावेळी अमिताभ बच्चन सुद्धा भावुक झालेले दिसले.

'Superstar Singer'मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम

दीपज्योती सांगते, माझ्या वडिलांना बिझनेसमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे ते कुणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेले. त्यानंतर माझ्या मोठ्या भावाचं अचानक निधन झालं. पण हे सर्व झाल्यानंतरही मी आयुष्यात कधीच हार मानली नाही. आयुष्यात अनेक समस्या आल्या पण त्यांचा सामना करत आज मी इथंपर्यंत पोहोचले आहे.

KBC-11 जिंकायचे होते 7 कोटी; आठव्याच प्रश्नावर शिक्षक झाले नापास मिळाले फक्त...

दीपज्योती व्यवसायानं शिक्षिका आहे. पण यासोबतच ती तिचं पुढंच शिक्षणही पूर्ण करत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन दीपज्योतीला 50 लाखांचा प्रश्न विचारताना दिसले. त्यावर असं दिसतं की, तिनं या शोमधून मोठी रक्कम जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

जॅकलिनने पहिल्यांदा काढला पोटावर 'खास' Tattoo, पाहा व्हायरल व्हिडिओ!

=============================================================

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

Published by: Megha Jethe
First published: October 8, 2019, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading