नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : स्मार्टफोन वापरताना अनेकदा लिंकद्वारे हॅकिंगचा धोका असतो. Smartphone ला धोकादायक Apps पासून धोका असतो. असे अनेक अॅप्स (151 dangerous apps for Smartphone) आहेत ज्यामुळे युजर्सची सुरक्षा, गोपनियता किंवा खाजगी डाटा चोरी होण्याची शक्यता असते.
धोकादायक Apps स्मार्टफोनमध्ये डाउनलोड झाल्यास (Dangerous apps for android) अनोळखी मेसेज आणि ई-मेल्स येतात. त्यामाध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचीही शक्यता असते. असे धोकादायक Apps स्मार्टफोनमध्ये येऊ नये यासाठी गूगलकडून नेहमी अलर्ट केलं जातं.
Avast ने जारी केला धक्कादायक रिपोर्ट -
सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेयर कंपनी अवास्ट (Avast) ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार मागील काही काळापासून UltimaSMS नावाच्या धोकादायक App वर संशोधन केलं आहे. त्यात Avast ला या संशोधनात 151 धोकादायक Apps मुळे युजर्सची खाजगी माहिती चोरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या Apps च्या माध्यमातून युजर्सला काही टुल्स दिले जातात त्यानंतर युजर्सला ऑनलाइन आर्थिक गंडा घालण्यात येतो.
जर तुम्ही अल्टिमा एसएमएस (UltimaSMS) हे अॅप वापरत असाल, तर त्यामुळे युजर्सचं Live Location, IMEI नंबर आणि युजर्सचा देश, भाषा ही माहिती चोरली जाते. त्यावेळी संबंधित युजर्सला त्याच्या स्थानिक भाषेत SMS किंवा ई-मेल टाकण्यासंबंधीचा मेसेज येतो, जो धोकादायक (list of bad android apps 2021) असतो. App कडून मागवण्यात आलेली माहिती युजर्सने पुरवल्यावर त्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन युजर्सला लागू होते.
त्याची किंमत 3 हजारांपर्यंत असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने युजर्सला आर्थिक फटका बसतो. अशा धोकादायक Apps मुळे युजर्सच्या खासगी माहितीला आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांना धोका पोहचत आहे.
अशा धोकादायक Apps वर असतो जाहिरातींचा भडिमार -
जेव्हा हे धोकादायक Apps स्मार्टफोनमध्ये येतात त्यावेळी युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अचानक अनोळखी जाहिरातींमध्ये वाढ होते. या जाहिरातींचं माध्यम हे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक हे सोशल मीडिया App असतात. त्यामुळे कोणतीही अॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याआधी त्याच्या अटी शर्ती नीट वाचायला हव्या.
Google Play Store वरून हटवण्यात आले हे Apps -
-Ultima Keyboard 3D Pro
-VideoMixer Editor Pro
-FX Animate Editor Pro
-Battery Animation Charge 2021
-Dynamic HD & 4K Wallpapers
-RGB Neon HD Keyboard Background
-AppLock X FREE
जर तुम्हाला संपूर्ण Apps ची लिस्ट पाहायची असेल तर UltimaSMS Scam या वेबसाईटला भेट द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Android, Apps, Google, Smartphones