• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Fraud Alert! Online Shopping करताना अशी होऊ शकते फसवणूक; या गोष्टी लक्षात ठेवाच

Fraud Alert! Online Shopping करताना अशी होऊ शकते फसवणूक; या गोष्टी लक्षात ठेवाच

ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना बँक खात्याच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घेणं फायदेशीर ठरेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : दिवाळीच्या (Diwali) सणानिमित्त सध्या ग्राहकांद्वारे मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. Online Shopping वर मिळणाऱ्या ऑफर आणि होम डिलिव्हरीमुळे ग्राहक अशा व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. परंतु आता अशा या ऑनलाइन शॉपिंगच्या आर्थिक व्यवहारांमध्ये ग्राहकांची (Online fraud while shopping) फसवणूकही होते आहे. हॅकर्सकडून या व्यवहारांमध्ये हॅकिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना बँक खात्याच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टींची काळजी घेणं फायदेशीर ठरेल. जेव्हा ग्राहक सतत ऑनलाइन शॉपिंग करत असेल, तर त्याला सातत्यानं अनोळखी नंबर्सवरून फोन येऊ लागतात. त्यावरून संबंधित ग्राहकाच्या खात्याची माहिती विचारली जाऊ शकते. अशा वेळी ग्राहकांनी त्यांच्या खात्याविषयी किंवा ऑनलाइन व्यवहाराविषयी (online shopping fraud case) कोणतीही माहिती देऊ नये, या अनोळखी कॉल्समधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते.

  JioPhone Next चं बुकिंग सुरू, तीनप्रकारे बुक करू शकता सर्वात स्वस्त Smartphone

  हे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी मोबाईल नंबर, SMS, Mail, यूजरनेम, पासवर्ड, OTP  किंवा सोशल मीडियावरील कोणतीही गोपनीय (online shopping frauds) माहिती इतरांबरोबर कधीही शेयर करू नये. त्याचबरोबर ग्राहकांनी आपल्या बँक खात्यावर Multi-factor authentication ची प्रक्रिया पूर्ण करायला हवी. जेणेकरून खात्याची सुरक्षा वाढेल. त्याचबरोबर कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी Google किंवा सोशल मीडिया अकाउंटवरुन आलेल्या अनोळख्या लिंक्सवरती क्लिक करू नये.

  चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत? असे परत मिळतील पैसे

  या लिंक फेक, बनावट असण्याची शक्यता असते. अनेकदा ग्राहकांना 'बँकेचा अधिकारी बोलतोय' असं सांगून ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. हे आर्थिक फसवणूक करणारे कॉल असू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही माहिती या कॉल्सवरून अनोळखी लोकांना शेयर करू नये. कोणतीही बँक, कोणतीही ऑनलाइन शॉपिंग साइट किंवा इतर कोणत्याही अधिकृत ठिकाणावरुन फोनवर खासगी माहिती, बँक डिटेल्स विचारले जात नाहीत. त्यामुळे कोणी बँकेतून किंवा संबंधित ठिकाणावरुन बोलत असल्याचं सांगत माहिती मागत असेल,तर अशावेळी सावध व्हा.
  Published by:Atik Shaikh
  First published: