नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : Apple कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी काही तरी नवनवीन अपडेट्स आणत असते. यामुळे युजर्सच्या सुरक्षेत वाढ होत असते. आता अॅपल कंपनी अशा एका फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे कार अपघाताची (
Accident information available in Apples smartphones) माहिती मिळवता येऊ शकते. जेव्हा वाहनाचा अपघात होईल त्यावेळी आपोआप अॅपलच्या स्मार्टफोनवरून टूल्स नंबर 911 डायल होणार आहे.
या फीचरचा (
Apple company issued an update) फायदा अॅपलच्या युजर्सला होणार आहे. द वॉल स्ट्रीट जर्नल (
The Wall Street Journal) ने दिलेल्या माहितीनुसार अॅपल कंपनी या फीचर्सची सुरूवात पुढील वर्षापासून करण्याची शक्यता आहे. सध्या गूगल पिक्सलच्या स्मार्टफोन्सवर ही सुविधा देण्यात आलेली आहे. आता अॅपल कंपनी त्यांच्या युजर्सला ही सुविधा देणार आहे.
ज्यात ऑनस्टार, सुबारूच्या स्टारलिंकचा समावेश असेल. कार ड्रायव्हर्सला अपघातावेळी अॅपलच्या स्मार्टफोनची असिस्टंटच्या रूपात मदत होणार आहे. अॅपलने दिलेल्या माहितीनुसार वाहनांमध्ये अनसेफ स्मार्टफोनच्या वापरांमुळे अँड्रॉईड ऑटो आणि इंटीग्रेशन सिस्टम (
Accidet information in Apples smartphones) वाहनांमध्ये देण्यात आली होती.
त्यामुळे आता कंपनी युजर्सच्या सुरक्षेकसाठी हे फीचर्स आणणार असल्याचं बोललं जात आहे. अॅपलचं हे फीचर युजर्सच्या सुरक्षेसाठी किती प्रभावी ठरेल याचीही उत्सुकता आहे. पुढच्या वर्षी हे फीचर युजर्सला आपल्या iPhone मध्ये इन्स्टॉल करता येऊ शकतं, अशी माहितीही काही रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.