नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी Redmi कंपनीने देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रसिद्ध मोबाईल कंपनी Samsung ने ही Samsung Galaxy A13 धमाकेदार फीचर्स असलेला सर्वात स्वस्त (Samsung Galaxy A13 5G the cheapest 5G Smartphone) मोबाइल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Samsung चा हा 5G फोन असणार आहे. कंपनीने (Samsung Smartphone) अद्याप स्मार्टफोन्सच्या लॉन्च डेटबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु आता त्याचे काही फीचर्स लीक झाले आहेत.
लीक झालेल्या एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A13 मध्ये 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 8GB रॅमची स्टोरेज क्षमता देण्यात येणार आहे. गीकबेंच वेबसाइटने दिलेल्या रिपोर्टनुसार (Samsung Galaxy A13 with a 50MP camera) या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. सध्या मार्केटमध्ये Note 10T हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की हा स्मार्टफोन 18,600 रूपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy A13 5G या स्मार्टफोनमध्ये 6.48 इंची फुल-एचडीचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने यात फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB, 6GB आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 25W क्षमतेचा फास्ट चार्जरही देण्यात येणार आहे.
Samsung ने Galaxy A13 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येण्याची शक्यता आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरासह, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung, Samsung galaxy, Smartphone