मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Chrome युजर्स सावधान, लगेच करा सिस्टम Update; नाहीतर बसेल मोठा फटका

Google Chrome युजर्स सावधान, लगेच करा सिस्टम Update; नाहीतर बसेल मोठा फटका

तुम्ही Google Chrome चा वापर करत असाल, तर ब्राउजर लगेच अपडेट करण्याची गरज आहे.

तुम्ही Google Chrome चा वापर करत असाल, तर ब्राउजर लगेच अपडेट करण्याची गरज आहे.

तुम्ही Google Chrome चा वापर करत असाल, तर ब्राउजर लगेच अपडेट करण्याची गरज आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : तुम्ही Google Chrome चा वापर करत असाल, तर ब्राउजर लगेच अपडेट करण्याची गरज आहे. यापूर्वीही गुगल क्रोम युजर्सला सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी वेब ब्राउजर अपडेट करण्याबाबत सांगण्यात आलं होतं. ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये Google कडून क्रोम अपडेट करण्याचा इशारा देण्यात आला होता.

Google च्या सायबर टीमकडून दोन मुद्दे शोधण्यात आले आहेत. या दोन्ही मुद्द्यांना zero-day रेटिंग देण्यात आलं आहे. zero-day रेटिंग म्हणजे सध्या असलेल्या बगची हॅकर्सला माहिती आहे आणि ते युजर्सवर सायबर हल्ला करण्यासाठी या बगचा वापर करत आहेत. या माहितीनंतर आता Google चं नवं Google Chrome पॅच जारी करण्यासाठी तयार असून युजर्सला आपलं Chrome लगेच अपडेट करण्यासाठी सांगितलं आहे. Google ने स्टेबल चॅनल 95.0.4638.69 मध्ये अपडेट केलं आहे.

Google Chrome कसं कराल अपडेट?

- तुमचं ब्राउजर अपग्रेड करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही लेटेस्ट वर्जनचा उपयोग करताय का ते तपासा.

- About Google Chrome वर जा. इथे Chrome Version तपासा.

- गुगलचं हे अपडेट 95.0.4638.69 वापरत नसाल, तर ते अपग्रेड करुन त्यानंतर सॉफ्टवेअर रिस्टार्ट करण्याबाबत सांगितलं जाईल.

- एकदा Google Chrome अपडेट डाउनलोड झाल्यानंतर तुमचं नवं वर्जन सुरक्षित आहे.

या 6 गोष्टी लक्षात ठेवून करा Smart Shopping; फसव्या ऑफर्स, कर्जापासून राहाल दूर

Google Chrome अपग्रेड का आवश्यक?

Google ने झिरो-डे या धोकादायक बगबाबत इशारा दिला आहे. हा केवळ 1 बग नसून एकूण 4 आहेत. त्यापैकी दोन सर्वात धोकादायक आहेत आणि त्यांना अधिक धोकादायक असणारे बग सांगण्यात आलं आहे. झिरो-डे एक्सप्लॉइड म्हणजेच सायबर क्रिमिनल्स याचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम होते. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सर्व युजर्ससाठी Google Chrome अपग्रेड आवश्यक आहे. लवकरात लवकर हे अपग्रेड करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा युजरचा डेटा धोक्यात येऊ शकतो. हॅकर्स युजर्सच्या कंप्यूटरमधून त्यांचा डेटा आणि इतर माहिती चोरी करू शकतात.

First published:

Tags: Google, Tech news