ब्रिस्बेन, 16 ऑक्टोबर: टीम इंडिया 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानं आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. पण त्याआधी ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. तेही गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम्सशी. सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर सराव सामना होणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबरला टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. पण त्याआधी कांगारुंविरुद्धच्या सराव परीक्षेत टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणते प्रयोग करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. शमी फिट, पण महामुकाबल्यात खेळणार? दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराच्या जागी भारतीय संघात वर्णी लागलेल्या शमीनं आज ब्रिस्बेनमध्ये जोरदार सराव केला. शमी आगामी लढतीसाठी फिट आहे. पण त्याला पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात खेळवणार का? हा सध्यातरी प्रश्नच आहे. कारण जुलैपासून शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकांमध्ये शमीचा भारतीय संघात समावेश होता. पण ऐनवेळी कोरोना झाल्यानं त्याला दोन्ही मालिकांना मुकावं लागलं होतं. पण अता तो फिट असून सरावादरम्यानं त्यानं बराच वेळ बॉलिंग केल्याचं पाहायला मिळालं.
रोहित, विराटचा कसून सराव दरम्यान आज ब्रिस्बेनमध्ये भारतीय फलंदाजांनी बराच वेळ सराव केला. रोहतसह विराट कोहली आणि टीम इंडियाच्या इतर फलंदाजांनी नेट्समध्ये बॅटिंग प्रॅक्टिस केली.
@imVkohli practising at Gabba Brisbane Stadium.
— Viratian 18 (@iambaljeetVk18) October 16, 2022
Credit: neelaprajapati (ig) pic.twitter.com/YCiZmvoBKh
कुठे दिसणार भारत-ऑस्ट्रेलिया लढत? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सराव सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरुन केलं जाणार आहे. तर डिस्ने हॉटस्टारवर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाईल. हेही वाचा - T20 World Cup: 16 वर्षांचा ‘हा’ पोरगा खेळतोय वर्ल्ड कप, मैदानात उतरताच मोडला आमीरचा रेकॉर्ड भारत वि. ऑस्ट्रेलिया, सराव सामना सोमवारी सकाळी 9.30 वा. गॅबा, ब्रिस्बेन भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, दीपक हुडा