जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: 16 वर्षांचा 'हा' पोरगा खेळतोय वर्ल्ड कप, मैदानात उतरताच मोडला आमीरचा रेकॉर्ड

T20 World Cup: 16 वर्षांचा 'हा' पोरगा खेळतोय वर्ल्ड कप, मैदानात उतरताच मोडला आमीरचा रेकॉर्ड

अयान अफझल खान, यूएई

अयान अफझल खान, यूएई

T20 World Cup: यूएईच्या टीममधून ऑल राऊंडर अयान खाननं टी20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पणाचा सामना खेळला. यावेळी त्याचं वय होतं 16 वर्ष आणि 335 दिवस. टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात 17 वर्षांखालील तो पहिलाच खेळाडू ठरला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गिलॉन्ग, 16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियात सुरु झालेल्या  टी20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्याच दिवशी रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या. आशिया कप जिंकलेल्या श्रीलंकन संघाला नामिबियासारख्या टीमसमोर गुडघे टेकावे लागले. तर नेदरलँड्सनं अखेरच्या ओव्हरमध्ये यूएईविरुद्ध विजय साजरा केला. दोन्ही सामन्यात कमालीच्या टीमवर्कमुळे नामिबिया आणि नेदरलँडचे संघ विजयी ठरले. पण आजच्या दिवसात एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा झाली. हा खेळाडू अवघ्या 16 वर्षांचा आहे आणि तो चक्क टी20 वर्ल्ड कप खेळतोय. त्यानं आज यूएईकडून वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं. इतकच नव्हे तर त्यानं मैदानात उतरताच पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरचा 13 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला. 16 वर्षांच्या अयान खानचं वर्ल्ड कप पदार्पण अयान अफझल खान… यूएईच्या टीममधून ऑल राऊंडर अयान खाननं टी20 वर्ल्ड कपमध्ये पदार्पणाचा सामना खेळला. यावेळी त्याचं वय होतं 16 वर्ष आणि 335 दिवस. टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात 17 वर्षांखालील तो पहिलाच खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरच्या नावावर होता. आमीरनं 2009 साली टी20 वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळला तेव्हा तो अवघ्या 17 वर्षांचा होता.

News18

कमी वयात टी20 वर्ल्ड कप खेळणारे खेळाडू 2022 : अयान खान, यूएई - 16 वर्ष 335 दिवस 2009 : मोहम्मद आमीर, पाकिस्तान - 17 वर्ष 55 दिवस 2016 : रशिद खान, अफगाणिस्तान - 17 वर्ष 170 दिवस 2009 : अहमद शहजाद, पाकिस्तान - 17 वर्ष 196 दिवस 2010 : जॉर्ज डॉकरेल, आयर्लंड - 17 वर्ष 282 दिवस

जाहिरात

हेही वाचा -  T20 World Cup: नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट? पाहा समीकरण अयानची पदार्पणात प्रभावी कामगिरी यूएईनं नेदरलँडविरुद्धचा सामना गमावला असला तरी अयाननं मात्र अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. 16 वर्षांच्या अयाननं तीन ओव्हरमध्ये 15 धावा देताना एक विकेट घेतली. पण फलंदाजीत मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. 5 धावा काढून तो बाद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात