मुंबई, 16 ऑक्टोबर: यंदाच्या टी वर्ल्ड कपची सुरुवात धक्कादायक निकालानं झाली. नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आणि वर्ल्ड कप मोहिमेला दणक्यात सुरुवात केली. त्याचबरोबर नामिबियासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण नामिबियन आजवर आयसीसीच्या टॉप टेन संघांपैकीकी एकाही संघाविरुद्ध विजय मिळवलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या मैदानात गेरार्ड इरॅस्मसच्या संघानं तो कारनामा करुन दाखवला. नामिबियाच्या याच ऐतिहासिक विजयानंतर अनेकांनी या संघाचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यातलच एक नाव आहे ते म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिननंही ट्विट करत नामिबियाच्या विजयानंतर एक खास रिअॅक्शन दिली आहे. नामिबिया… ‘नाम’ याद रखना सचिननं वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यानंतर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सचिन म्हणतो, ‘नामिबियानं आज क्रिकेटविश्वाला सांगितलंय… ‘नाम’ याद रखना.’
Namibia 🇳🇦 has told the cricketing world today… “Nam” yaad rakhna! 👏🏻
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 16, 2022
सचिनच्या म्हणण्याप्रमाणे खरंच नामिबियानं आज क्रिकेटविश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. आपल्या ऑल राऊंड परफॉर्मन्सनं त्यांनी आशिया कप विजेत्या श्रीलंकेची दाणादाण उडवली. आणि तब्बल 55 धावांनी सामनाही खिशात घातला. आता क्वालिफाईंग फेरीत आणखी एक विजय मिळवून नामिबियाची नजर सुपर 12 फेरीवर असेल. कॅप्टन इरॅस्मस भावूक सामना जिंकल्यानंतर नामिबियाचा कॅप्टन गेरार्ड इरॅस्मस भावूक झाला होता. त्यानं म्हटलंय की ’ अविश्वसनीय प्रवास… मागचं वर्ष आमच्यासाठी खास होतं. आम्ही स्पर्धेची सुरुवात खूप चांगली केली आहे, पण यापुढे सगळ्या बाजूंनी आणखी चांगल करण्याची आम्हाला गरज आहे. आमच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पहिला दिवस खास होता पण आम्हाला आता सुपर 12 साठी क्वालिफाय करायचं आहे.’
A day Namibia won't forget anytime soon 😍#T20WorldCup pic.twitter.com/KCdzxUORsb
— ICC (@ICC) October 16, 2022
हेही वाचा - T20 World Cup: लंकेची झाली दैना… ‘या’ टीमनं वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केला मोठा उलटफेर कोच पायरे यांचं कौतुक दरम्यान कॅप्टन इरॅस्मसनं श्रीलंकेवरील विजयाचं श्रेय कोच पायरे डी ब्रुएना यांना दिलं. ‘या विजयाचं श्रेय डी ब्रुएना यांना जातं ज्यांनी टीमला आपल्या मार्गदर्शनानं टीमला इथपर्यंत आणलं.’ श्रीलंकन संघ आशिया कपसारखी मोठी स्पर्धा जिंकून टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. नामिबियाचं आव्हान श्रीलंकेसमोर तितकसं कठीण नव्हतं. पण तरीही श्रीलंकेला सलामीलाच याच संघाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.