मराठी बातम्या /बातम्या /religion /

Shani Krupa : जर शनिवारी दिसल्या या गोष्टी तर समजा अडचणींचा काळ संपला.

Shani Krupa : जर शनिवारी दिसल्या या गोष्टी तर समजा अडचणींचा काळ संपला.

जीवनात कधी ना कधी शनि साडेसाती, महादशा आणि ढय्या इत्यादीतून जावे लागते.

जीवनात कधी ना कधी शनि साडेसाती, महादशा आणि ढय्या इत्यादीतून जावे लागते.

जीवनात कधी ना कधी शनि साडेसाती, महादशा आणि ढय्या इत्यादीतून जावे लागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Prachi Dhole

मुंबई ,9 डिसेंबर: शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. सामान्यतः शनिदेवाचा स्वभाव अतिशय क्रूर असल्याचे म्हटले जाते, पण तसे नाही. खरे तर शनिदेव हे न्यायाचे देव आहेत, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते शिक्षा करतात आणि वरदानही देतात. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी शनि साडेसाती, महादशा आणि ढय्या इत्यादीतून जावे लागते, परंतु जर तुमची कर्म चांगले असतील तर या स्थितीतही तुमचे कधीही वाईट होणार नाही. म्हणूनच कर्म चांगले करा. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कर्मावर शनि भगवान प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळतो, तर त्याचे भाग्य उजळते. त्याचा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही.

शनिदेवाने तुमच्यावर कृपा केली आहे, हे तुम्ही काही चिन्हांवरून जाणून घेऊ शकता. येथे जाणून घ्या त्या गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला शनिवारी सकाळी रस्त्यावर दिसल्या तर समजून घ्या की, ही शनिदेवाची महिमा आहे. हे लक्षण आहे की शनिदेवाच्या कृपेने तुमचे भाग्य लवकरच चमकणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील समस्या संपल्यानंतर चांगले दिवस येणार आहेत.

भिकारी

गरजूंना मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी सकाळी एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला कधीही शिवीगाळ करून हाकलून देऊ नका. हे खूप शुभ मानले जाते आणि शनिदेवाच्या कृपेचे लक्षण आहे. अशा वेळी आपल्या क्षमतेनुसार दान करून त्याला मदत करा. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात.

सफाई कामगार

जर तुम्ही सकाळी काही काम करण्यासाठी घराबाहेर पडला असाल आणि अचानक तुम्हाला एखादा सफाई कामगार रस्ता झाडताना दिसला तर तेदेखील खूप शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला तुमच्या बाजूने नक्कीच काहीतरी द्या. याचा अर्थ आता शनिदेव तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.

काळा कुत्रा

शनिवारी सकाळी रस्त्यावर काळे कुत्रा दिसणेदेखील शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. अशा वेळी काळ्या कुत्र्याला दूध, रोटी, मोहरीच्या तेलाचा पराठा, भाकरी वगैरे खाऊ घाला. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Home remedies, Horoscope, Rashibhavishya, Shani Jayanti, Vastu