मराठी बातम्या /बातम्या /religion /शनिवार आणि काळ्या उडीदाचे सूत्र अनेकांना नाही माहीत; आश्चर्यकारक आहेत परिणाम

शनिवार आणि काळ्या उडीदाचे सूत्र अनेकांना नाही माहीत; आश्चर्यकारक आहेत परिणाम

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपायही खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपायही खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपायही खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.

मुंबई, 16 जुलै : सनातन धर्म आणि ज्योतिष शास्त्रात शनिदेव आणि शनि ग्रहाचे वर्णन अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. शनिदेव आपल्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. एखाद्या व्यक्तीवर शनिची वक्रदृष्टी असेल तर त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. दुसरीकडे, जर शनिदेव एखाद्याच्या कर्माने प्रसन्न झाले तर तुम्हाला त्यांचे शुभ आशीर्वाद देतात, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक यशाची दारे उघडतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपायही खूप महत्त्वाचा मानला जातो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी काळ्या उडदाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात.

काळ्या उडदासाठी ज्योतिषीय उपाय -

शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि मोहरीचे तेल अर्पण केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. यासोबतच घरात अन्न आणि धनाचा नेहमीच सुकाळ राहतो.

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्याने शनिवारी 4 दाणे काळे उडीद स्वत:वरून उलटे उतरवून कावळ्याला खायला घालावेत. हा उपाय सलग 7 शनिवारी केल्यास लाभ होतो. काळ्या उडदाची डाळ दान करणे देखील फायदेशीर ठरते.

भाग्य चमकण्यासाठी -

दुर्दैव तुमचा पिच्छा साथ सोडत नसेल, नशीब साथ देत नसेल तर काळ्या उडीदचे 2 दाणे घेऊन त्यावर दही आणि कुंकू लावा. आता त्यांना पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ ठेवा. शनिवारपासून हा उपाय सुरू करा आणि सलग 21 दिवस करा. लाभ मिळेल.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

संपत्ती वाढवण्याचे मार्ग -

जर तुम्हाला आर्थिक संपत्ती वाढवायची असेल आणि उधळपट्टी टाळायची असेल तर शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे दोन वडे करून त्याला कुंकू आणि दही लावून पिंपळाच्या झाडासमोर ठेवा. हा उपाय केल्यावर मागे वळून पाहू नका. हा उपाय सलग 11 शनिवारी केल्यास फायदा होईल.

नवीन व्यवसायात यश -

जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जुन्या व्यवसायाच्या ठिकाणाहून एक लोखंडी वस्तू आणा आणि नवीन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यापूर्वी त्या ठिकाणी स्वस्तिक बनवा आणि थोडे काळे उडीद ठेवा. या उपायाने व्यवसायात प्रगती होईल.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion