ज्योतिषशास्त्र ही प्राचीन विद्याशाखा आहे. प्रामुख्याने भविष्यकथनासाठी या शास्त्राचा वापर केला जातो. नवग्रह, 27 नक्षत्रं आणि 12 राशी हे या शास्त्राचे मूलभूत घटक आहेत. या घटकांच्या आधारे अभ्यासान्ती सूत्र आणि गणितीय पद्धती निश्चित केल्या गेल्या आहेत. ही सूत्रं आणि गणितीय पद्धती आजही प्राचीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. किंबहुना या घटकांचा वापर आजही भविष्यकथनासाठी केला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि जीवनातल्या घटकांवर राशीचा परिणाम होत असतो. राशिचक्रात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचा समावेश होतो. या र