मुंबई, 10 सप्टेंबर : शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेव व्यक्तीला चांगल्या कर्मांचे चांगले फळ देतात आणि वाईट कर्मांची शिक्षा देतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की, ज्याच्यावर शनी कृपा असते त्याला राजसुख किंवा विलासी जीवन मिळते. ज्याच्या कुंडलीत शनिदेवाची अशुभ दृष्टी असते, त्याच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात, त्यामुळे शनिवारी लोक विधीनियमानुसार शनिदेवाची पूजा करतात, त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची अशुभ स्थिती शुभ होते. या दिवशी मोहरीचे तेल अर्पण करणे आणि मोहरीचे तेल दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, असे मानले जाते.
शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. शिवाय काही कामे शनिवारी करू नयेत, असे मानले जाते. शनिवारी ही कामे केल्याने शनिदेवाचा कोप होतो. ज्योतिषी पंडित गोविंद पांडे यांच्याकडून जाणून घेऊया शनिवारी कोणती कामे करू नयेत.
मांस आणि मद्य सेवन -
शनिवारी मांस आणि मद्य यासारख्या गोष्टींपासून दूर राहा. या दिवशी या पदार्थांचे सेवन करणे घातक मानले जाते. शनिवारी या गोष्टींचे सेवन करणे अशुभ मानले जाते. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रवास करू नका -
शनिवारी पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला प्रवास करणे देखील अशुभ मानले जाते. विशेषत: पूर्व दिशेला या दिवशी प्रवास करू नये. जर जाणे खूप महत्त्वाचे असेल तर प्रवासापूर्वी आले खावे किंवा प्रवास करण्यापूर्वी पाच पावले उलटे चालावे, अन्यथा शनिदेवाच्या वाईट दृष्टीचे बळी होऊ शकता.
या वस्तू खरेदी करू नका -
शनिवारी तेल, लाकूड, कोळसा, मीठ, लोखंडाची वस्तू खरेदी करू नये, त्यामुळे जीवनात अडथळे निर्माण होतील आणि अचानक त्रास सहन करावा लागू शकतो.
केस आणि नखे कापू नका -
शनिवारी केस कापणे, नखे कापणे, केस धुणे हेही निषिद्ध मानले जाते. या दिवशी या सर्व गोष्टी केल्याने शनिदेव क्रोधित होतात, असे मानले जाते.
हे वाचा - या राशीचे लोक असतात खूप सपोर्टिव्ह, तुमच्याही आयुष्यात आहे का अशी एखाद व्यक्ती?
या गोष्टींचे सेवन करू नका -
याशिवाय शनिवारी दूध आणि दही टाळावे. जर तुम्हाला प्यायचे असेल तर त्यात हळद किंवा गूळ जरूर टाका. याशिवाय वांगी, आंब्याचे लोणचे आणि तिखट खाणेही या दिवशी टाळावे.
हे वाचा - एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.